शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

क्रांतिज्योतींचा समतेचा मंत्रच देशाला वाचवेल : छगन भुजबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 16:38 IST

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी तत्कालीन समाजाला सामाजिक क्रांतीची नवी दृष्टी दिली. नायगाव हे सर्वांचे शक्तिपीठ आहे. त्यामुळे त्यांच्या स्मारकाबाबत सर्व कामे निश्चितपणे होतील. क्रांतिज्योतींचा समतेचा मंत्रच देशाला वाचवू शकतो, असे मत मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले

ठळक मुद्देक्रांतिज्योतींचा समतेचा मंत्रच देशाला वाचवेल : छगन भुजबळसावित्रीबाई फुले यांना नायगावमध्ये अभिवादन

खंडाळा : ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी तत्कालीन समाजाला सामाजिक क्रांतीची नवी दृष्टी दिली. नायगाव हे सर्वांचे शक्तिपीठ आहे. त्यामुळे त्यांच्या स्मारकाबाबत सर्व कामे निश्चितपणे होतील. क्रांतिज्योतींचा समतेचा मंत्रच देशाला वाचवू शकतो, असे मत मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.नायगाव येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी मंत्री बाळासाहेब पाटील, मंत्री शंभूराज देसाई, माजी मंत्री प्रा. राम शिंदे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, आमदार मकरंद पाटील, आमदार जयकुमार गोरे, माजी आमदार शशिकांत शिंदे, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, नितीन बानगुडे-पाटील, कमलताई ढोले-पाटील, बापूसाहेब भुजबळ, सभापती राजेंद्र तांबे, उपसभापती वंदना धायगुडे, जिल्हा परिषदेच्या सदस्या दीपाली साळुंखे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, प्रा. हरी नरके, मंजिरी धाडगे, राजेंद्र नेवसे, सरपंच सुधीर नेवसे, उपसरपंच सीमा कांबळे उपस्थित होते.मंत्री छगन भुजबळ म्हणाले, ह्यनायगावच्या सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे काम खडतर परिस्थितीमध्ये सुरू केले. शेती आणि उद्योगाचे ज्ञान शिक्षणातून दिले पाहिजे, हा विचार महात्मा फुले यांनी दीडशे वर्षांपूर्वी मांडला. महिलांच्या शिक्षणासाठी ज्यांनी बीजं रोवली, त्या सावित्रीबार्इंनाच शिक्षणाची खरी देवता मानली पाहिजे.आमदार मकरंद पाटील म्हणाले, सातारा जिल्ह्यातील युगपुरुषांची जन्मगाव जिल्ह्याचे वैभव आहे.सावित्रीबार्इंचे कार्य महिलांसह समाजाला प्रेरणादायी आहे. नायगावचा विकास आणि फुले दाम्पत्यांच्या विचारावर महाराष्ट्राची विकासाची घोडदौड सुरू ठेवण्यासाठी छगन भुजबळ यांचे मोठे योगदान आहे. नायगावच्या विकास आराखड्यासाठी विशेष बैठक घ्यावी. मांढरदेव रस्ता आराखडा तयार आहे, तो मार्गी लावण्यासाठी प्रयत्न व्हावेत.ह्णजिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील यांनी स्वागत केले. सरपंच सुधीर नेवसे यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी आभार मानले.उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा गौरव करणारनायगाव येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित केले पाहिजे. त्यासाठी दरवर्षी एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्याचे नियोजन करणार आहे. त्यामुळे महिलांच्या चांगल्या कामाचा गौरव आणि इतरांना स्फूर्ती मिळेल, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळSatara areaसातारा परिसरSavitri Bai Phuleसावित्रीबाई फुले