शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कमालच! अवघ्या तीन वर्षाच्या 'अन्वी'ने सर केलं कळसुबाई शिखर, साडेतीन तासांत आईसह मोहीम फत्ते

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 14:33 IST

अन्वीने आई अनिता सोबत यापुर्वी १८ महिन्यांची असताना पावनखिंड मोहीम फत्ते केली. दोन वर्षांची असताना तिने वेसरफ जंगल १३ किलोमीटरचा ट्रेक पूर्ण केला.

कोल्हापूर : ज्या वयात घरात नीट पाऊल टाकत चालता येत नाही, अशा अवघ्या २ वर्षे ११ महिन्याच्या अन्वी चेतन घाटगे हिने शुक्रवारी (दि. १) रोजी साडेतीन तासांच्या परिश्रमानंतर महाराष्ट्रातील सर्वात उंच समजले जाणारे कळसुबाई शिखर सर केले. ती अशी कामगिरी करणारी देशातील सर्वात लहान गिर्यारोहक ठरल्याची माहिती तिची आई अनिता, वडील चेतन घाटगे व प्रशिक्षक कोल्हापूर माऊंटेनिअरिंगचे सचिव सागर पाटील यांनी सोमवारी दिली.अन्वीने आई अनिता सोबत यापुर्वी १८ महिन्यांची असताना पावनखिंड मोहीम फत्ते केली. दोन वर्षांची असताना तिने वेसरफ जंगल १३ किलोमीटरचा ट्रेक पूर्ण केला. दोन वर्षे ५ महिन्यांची असताना तिने सादळे मादळे डोंगर सर केला. त्यानंतर अडीच वर्षाची असताना तिने मोरजाई, बोरबेट, पठार चढले. २ वर्षे ८ महिन्यांची असताना तिने शिवगड सर केला. मुळात तिच्या आई अनिता व जिल्हा पोलीस दलात असलेले चेतन घाटगे यांना गिर्यारोहणाची आवड आहे. या आवडीमुळे अन्वीलाही आईसोबत गिर्यारोहणाची आवड निर्माण झाली.याच आवडीतून तिने १ जुलैला आई व वडिलांसोबत एकटीने १,६४६ मीटर उंचीवरील कळसुबाई शिखर सर केले. या मोहिमेदरम्यान तिला प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जावे लागले. अनेकदा चढाई करताना पावसामुळे निसरडे झाले होते. दाट धुके, वेगाने वाहणारे वारे, मुसळधार पाऊस यावर मात करीत तिने हे मोहीम फत्ते केली. या कामगिरीची दखल घेत तेथील बारी ग्रामपंचायत (ता. अकोले, अहमदनगर) ने तिचा सत्कार केला. तिच्या या कामगिरीबद्दल गिर्याराेहण क्षेत्रातून कौतुक होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर