शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कोल्हापुरात 'शासन आपल्या दारी'त बनवाबनवी; जन्म, मृत्यू दाखलेधारकच केले लाभार्थी

By भीमगोंड देसाई | Updated: June 19, 2023 18:08 IST

मतदान ओळखपत्र दिलेल्यांची नावेही लाभाच्या यादीत

भीमगोंडा देसाई कोल्हापूर : सरकारच्या शासन आपल्या दारी उपक्रमात लाभार्थी संख्या वाढवण्यासाठी आणि फुगवण्यासाठी जन्म, मृत्यू दाखला, सातबारा उतारा, इनामपत्रक घेतलेल्यांचीही नावे घुसडल्याचे समोर आले आहे. ‘लोकमत’ने लाभार्थी यादीची कसून चौकशी केल्यानंतर ही बनवाबनवी समोर आली. प्रशासनाचे नियमित कामच उपक्रमात घेऊन मुख्यमंत्र्यांची शाबासकी मिळवली का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.शासनाचे काम आणि सहा महिने थांब ही संकल्पना नाहीशी होण्यासाठी शासन आपल्या दारी उपक्रम सरकार राबवत आहे. या उपक्रमात पात्र लाभार्थीच्या घरापर्यंत जाऊन लाभ देणे अपेक्षित आहे; पण अपवाद वगळता बहुतांशी लाभार्थींनी लाभासाठी यापूर्वी अर्ज केले होते, त्यांचेच नाव लाभार्थी यादीत टाकले आहे. त्यांनी प्रशासनाकडे अनेकवेळा हेलपाटेही मारले. यामुळे घरापर्यंत जाऊन लाभार्थी शोधल्याचा प्रशासनाचा दावा खोटा असल्याचे पुढे आले आहे.

शिधापत्रिकेत नाव वाढवणे, कमी करणे, जमीन मोजणी नकाशा, सनद देणे, कौशल्य विकास योजनेतून मोफत प्रशिक्षण देणे, उत्पन्नाचा दाखला देणे, फेरफार उतारा, इनाम पत्रक देणे, मालमत्तेचा नमुना आठ दाखला देणे, आयुष्यमान हेल्थ कार्ड देणे, आधार कार्डात दुरूस्ती करणे, आधार लिंक करणे अशी नियमित काम करून घेतलेल्यांची नावेही शासन आपल्या दारीत असल्याने हा लाभ आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे. शासनाचा हा उपक्रम नसला तरी शालेय मुलांना सायकल, वह्या, पुस्तके मोफत मिळतातच. त्याचीही नावे यादीत आहेत.

४२ हजार जणांचीच यादी

मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या शासन आपल्या दारीच्या कार्यक्रमात जिल्हा प्रशासनाकडूून या अभियानातून तब्बल १ लाख ५८ हजार जणांना लाभ दिल्याचे छातीठोकपणे सांगितले; मात्र इतक्या लाभार्थी संख्येची यादी जिल्हा पातळीवरील यंत्रणेकडे उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. यातील ४२ हजार जणांची यादीच उपलब्ध आहे.

महसूलमधील दलालांचा नंबर

आजरा तालुक्यातील सुळे येथील उत्पन्न दाखला मिळालेल्या एका लाभार्थीच्या मोबाईलवर संपर्क साधला. तो नंबर लाभार्थीला न लागता दुसऱ्यालाच लागला. अधिक चौकशी केल्यानंतर त्याने मी शंभर ते दीडशे रूपये घेऊन दाखले काढून देतो. महसूल मधीलही कामे करीत असल्याचे सांगितले. असे महसूलमधील दलालांचेही संपर्क नंबर लाभार्थी नावासमोर यादीत आहे.

म्हणे मतदान ओळखपत्रही लाभज्या कामांसाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांना वेतन मिळते. ते काम लाभार्थीच्या दारी जाऊन केल्याचे भासवण्यात आले आहे. मतदान ओळखपत्र दिलेल्यांची नावेही लाभाच्या यादीत आहेत. यामुळे शासन आपल्या दारीत लाभाची नवी व्याख्या तयार केली का असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

वैयक्तिक शौचालय अनुदानासाठी ग्रामसेवकाकडे अर्ज करून अनेक दिवस झाले. वारंवार हेलपाटे मारून मंजुरीसाठी विचारणा केली आहे. अजून मंजुरी मिळाली की नाही माहीत नाही. - एक लाभार्थी, वेळवट्टी, ता. आजरा.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरChief Ministerमुख्यमंत्रीEknath Shindeएकनाथ शिंदे