शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

टॅब असेल तरच होणार पशुगणना : पन्हाळा तालुक्याचे चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 23:41 IST

दर पाच वर्षांनी पशुसंवर्धन विभागाच्यावतीने पशुगणना केली जाते. पन्हाळा तालुक्यात पशुगणना करण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून टॅब व इतर साहित्य देण्यात येणार होते

ठळक मुद्देवरिष्ठ स्तरावरून उदासीन भूमिका मारक

संजय पाटील ।देवाळे : दर पाच वर्षांनी पशुसंवर्धन विभागाच्यावतीने पशुगणना केली जाते. पन्हाळा तालुक्यात पशुगणना करण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून टॅब व इतर साहित्य देण्यात येणार होते. मात्र, ते प्राप्त झाले नसल्याने पाच वर्षे उलटली तरीही प्रत्यक्षात तालुक्यामध्ये पशुगणनेस सुरुवात झालेली नाही.

शासकीय योजनांचा सर्वसामान्यांना लाभ मिळावा म्हणून विविध योजना राबविल्या जातात. तालुक्यात १९ वी पशुगणना सन २०१२ मध्ये करण्यात आली होती. त्यावेळी पशुपालकांच्या घरोघरी जाऊन रजिस्टरवर पशूंची नोंद करण्यात आली होती. मात्र, २० वी पशुगणना ही टॅबवर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यामुळे या टॅबच्या माध्यमातून सर्वप्रथम पशुपालकांची माहिती भरल्यानंतर त्यांच्याकडे असलेल्या पशुंची माहिती भरता येणार आहे. इतकेच नव्हे तर टॅबमध्ये नोंद घेणाऱ्या प्रगणकांचे लोकेशन वरिष्ठ अधिकाºयांना पाहता येणार आहे. त्यामुळे बोगस पशुगणनेला आळा बसणार आहे. त्यामुळे तालुक्यातील पशुधनाची संख्या स्पष्ट होणार आहे. पशुधनासाठी असणाºया योजनांचा फायदा पशुपालकांना होणार आहे परंतु, पाच वर्षांचा कालावधी उलटला असला तरी पशुसंवर्धन विभागाला तालुक्यातील पशुगणना करण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून टॅब मिळालेले नाहीत. त्यामुळे तालुक्यात आतापर्यंत पशुगणना झालेली नाही.

पशुगणना झाली असती तर यावर्षी तालुक्यात चारा किती लागणार आहे. किती चारा शिल्लक आहे. याबाबतची माहिती संबंधित विभागाला समजली असती; परंतु वरिष्ठ स्तरावरून उदासीन भूमिका पशुगणनेला मारक ठरत असल्याचे दिसून येत आहे.चाऱ्याचे नियोजन करताना अडचणीपन्हाळा तालुक्यात सन २०१२ च्या पशुगणनेनुसार तीस हजार गायी, एकोणसत्तर हजार म्हशी, बारा हजार मेंढ्या, ८८ हजार बॉयलर पक्षी असे सुमारे दोन लाखाच्या आसपास मोठ्या प्रमाणात पशुधन आहे. त्यामुळे पावसाळ्यात, उन्हाळ्यात जनावरांच्या चाºयाचे नियोजन करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे भविष्यात अनेक पशुपालकांना अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. 

पशुगणना अद्याप सुरू झालेली नाही. लवकरच वरिष्ठ पातळीवरून टॅब देण्यात येणार आहेत. त्यानंतर टॅबद्वारे पशुगणना कशी करायची याचे संबंधितांना प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यानंतरच पशुगणना सुरू होईल.- ए. व्ही. गावडे(तालुका पशुवैद्यकीय अधिकारी)

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरforest departmentवनविभाग