शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मूत मोठी घडामोड! दहशतवाद्यांनी लपवलेला सॅटेलाईट डिव्हाइस सापडला, सीमापार सुरु होता संपर्क
2
Nashik Municipal Corporation Election 2026 : "दोन्ही भावांमध्ये राम उरला नाही, जो राम का नहीं वो किसी काम के नहीं"; देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर साधला निशाणा
3
BMC Election 2026 : जय जवान पथकातील गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर दिली होती सलामी
4
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहितनं रचला नवा इतिहास; असा पराक्रम करणारा क्रिकेट जगतातील तो पहिलाच
5
"मला अजित पवारांवर कालही विश्वास होता आणि आजही आहे" सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
6
अमेरिकेने हाय टॅरिफ लादला; भारताने 'या' देशांकडे वळवला मोर्चा, निर्यातीत मोठी वाढ, पाहा आकडेवारी
7
भारत-बांगलादेश वादात पाकिस्तानची 'लुडबुड'; स्वतःच्या देशात सुरक्षेचा पत्ता नाही आणि म्हणतंय...
8
भारतावर विश्वास ठेवा, इतरांच्या दाव्यांकडे दुर्लक्ष करा; भारत-अमेरिका करारावर गोयल यांची स्पष्टोक्ती
9
"मी यांना चॅलेंज देतो की, या ठाकरे बंधूंनी..."; भाजपच्या गिरीश महाजन यांचा आक्रमक पवित्रा
10
IND vs NZ 1st ODI : न्यूझीलंडकडून सलामी जोडीनंतर डॅरिल मिचेलची बॅट तळपली! टीम इंडियासमोर ३०१ धावांचं आव्हान
11
₹३६३४१२००००००० स्वाहा...! देशातील 7 कंपन्यांना मोठा फटका, रिलायन्सचं सर्वाधिक नुकसान 
12
‘आमच्यावर बॉम्ब फेकले तर अमेरिकेचे..., तणाव वाढत असताना इराणची थेट धमकी   
13
“हिंदू समाजाने एकत्र राहणे गरजेचे, २० वर्षांत भारत देश विश्वगुरू बनून जगाला...”: मोहन भागवत
14
भाजपा बलात्काऱ्यांनाही संधी देणारा पक्ष, बेटी बचाव बेटी पढाव नाही तर…’, काँग्रेसची बोचरी टीका
15
PM Modi: भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या वाटेवर; पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य
16
इलेक्ट्रिक वाहनांची 'सुसाट' धाव! २०२५ मध्ये २३ लाख ई-वाहनांची नोंदणी; कोणतं राज्य अव्वल?
17
IND vs NZ : डॉक्टर तरुणीची रोहितसाठी हटके फलकबाजी; मैत्रिणीने वामिकाचा उल्लेख करत विराटकडे केली 'ही' मागणी
18
१८० किमी प्रति तास वेग, कपल कूप ते शॉवर सुविधा; स्लीपर वंदे भारत सेवेस सज्ज, १७ जानेवारीला…
19
इराणमध्ये मोठी कारवाई करण्याच्या तयारीत अमेरिका? ट्रम्प यांच्या धमकीनंतर, इस्रायल 'हाय अलर्ट'वर
20
‘जैशकडे हजारो आत्मघाती हल्लेखोर…’, नव्या ऑडियोमधून मसूद अझहरची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अंबाबाई मंदिराचे नुसतेच आराखडे

By admin | Updated: March 30, 2017 01:27 IST

विकासाची कोटींची उड्डाणे कागदावरच : आठ वर्षे फक्त चर्चा, सूचना, दुरुस्त्या, बदल

इंदुमती गणेश -- कोल्हापूर --अंबाबाई मंदिराच्या विकास आराखड्यांचा फेरा आठ वर्षांनंतरही सुटलेला नाही. शहराच्या दोन हजार कोटींच्या आराखड्यापासून सुरू झालेला हा प्रवास १२० कोटी, त्यानंतर ५० कोटी, पुढे सूचना, दुरुस्त्या करून २५० कोटी, पहिला टप्पा ७० कोटींचा आणि आता ९० कोटींचा झाला आहे. कोट्यवधींची ही उड्डाणे कागदावरच झाली असून अंबाबाई मंदिरात इंचभरही बदल झालेला नाही. नव्या चर्चा, सादरीकरण, सूचना, बदल आणि फेरआराखडा या फेऱ्यातून करवीर निवासिनी श्री अंबाबाईची सुटका कधी होणार, असा प्रश्न पडला आहे. एखाद्या देवस्थानालादेखील लालफितीच्या शासकीय कारभाराच्या दुर्दैवाचा फेरा कसा लागतो याचे उत्तम उदाहरण म्हणून आता अंबाबाई मंदिर सांगता येईल. सन २००९ सालापासून सुरू झालेले आराखड्याचे फेरे आठ वर्षांनंतरही थांबलेले नाहीत. साडेतीन शक्तिपीठ असलेल्या अंबाबाई मंदिराला दरवर्षी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत लाखोंनी वाढ होत असताना अंबाबाई मंदिराचे जतन, संवर्धन, भाविकांसाठी अन्नछत्र, यात्री-निवास पार्किंगसारख्या सोयी-सुविधा निर्माण करण्यात अद्याप महापालिका आणि देवस्थान समितीला यश आलेले नाही. अंबाबाई मंदिराचा पहिला आराखडा सादर झाला सन २००९ मध्ये. स्थलांतराला परिसरातील नागरिकांनी विरोध केला. त्यानंतर पुढील तीन वर्षे तोच आराखडा फिरवून मांडला जायचा. चंद्रकांतदादा पाटील पालकमंत्री झाल्यानंतर त्यांनी हा विषय मनावर घेतला आणि आराखड्यात दुरुस्त्या, बदल सुचविले. आराखडा जनतेसमोर सादर झाल्यावर पुन्हा दुरूस्त्या झाल्या, जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत चंद्रकांतदादांनी आराखड्याला मंजुरी दिल्यानंतर विभागीय आयुक्तांनी त्यावर बरेच बदल, स्फुटणी, आॅडिट अशा सूचना दिल्या. आता देवस्थान समितीच्यावतीने करण्यात येणाऱ्या जतन संवर्धन आणि अन्य कामांचा समावेश करून पहिल्या टप्प्यातील आराखडा ९० कोटींवर गेला आहे. तो सोमवारी शासनाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. हे विषय लागले मार्गी...केशवराव भोसले नाट्यगृहाचे नूतनीकरण २०१४ मध्ये सुरू झाले आणि हे काम दीड ते पावणेदोन वर्षांत संपले. आता दुसऱ्या टप्प्यासाठी तयारी सुरू झाली आहे. कोल्हापूर चित्रनगरी विकासकामांचा नारळ फुटून आता तेथे दिमाखात नवे भव्य सेट उभारले जात आहेत. गेल्या वर्ष दीड-वर्षात बनविण्यात आलेल्या जोतिबा मंदिराच्या २५ कोटींच्या आराखड्यालाही शासनाने काही दिवसांपूर्वी मंजुरी दिली. मात्र, सर्वांत आधी तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार होऊनही तो मार्गी लागलेला नाही.