शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
4
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
5
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
6
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
7
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
8
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
9
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
10
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
11
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
12
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
13
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
14
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
15
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
16
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
17
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
18
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
19
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
20
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल

गोकुळ मतमोजणी केंद्रात उमेदवार व प्रतिनिधींनाच प्रवेश : बलकवडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 19:29 IST

gokulMilk Election Kolhapur Police : रमणमळा येथे होणाऱ्या गोकुळ दूध संस्थेच्या निवडणुकीच्या मतमोजणी केंद्रावर उमेदवार व मतमोजणी प्रतिनिधी या व्यक्तींना प्रवेश देण्यात येणार आहे. त्यांच्याव्यतिरिक्त अन्य कोणालाही मतमोेजणी केंद्रात व मतमोजणी परिसरात येण्यास मनाई असून निकालानंतर रॅली किंवा मिरवणूकदेखील काढता येणार नाही, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली.

ठळक मुद्देगोकुळ मतमोजणी केंद्रात उमेदवार व प्रतिनिधींनाच प्रवेश : बलकवडे रॅली, मिरवणूक नाहीच : पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे

कोल्हापूर : रमणमळा येथे होणाऱ्या गोकुळ दूध संस्थेच्या निवडणुकीच्या मतमोजणी केंद्रावर उमेदवार व मतमोजणी प्रतिनिधी या व्यक्तींना प्रवेश देण्यात येणार आहे. त्यांच्याव्यतिरिक्त अन्य कोणालाही मतमोेजणी केंद्रात व मतमोजणी परिसरात येण्यास मनाई असून निकालानंतर रॅली किंवा मिरवणूकदेखील काढता येणार नाही, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली.कोरोनामुळे सध्या जिल्ह्यात आपत्ती निवारण कायद्यांतर्गत जमावबंदी आदेश लागू आहेत, त्यामुळे उमेदवार व त्यांचे मतमोजणी प्रतिनिधी यांच्याव्यतिरिक्त मतमोजणी केंद्राबाहेर तसेच परिसरात मतमोजणी प्रक्रिया ऐकण्यासाठी कोणालाही थांबता येणार नाही. जमाव करता येणार नाही. तसेच अन्य कोणालाही लॉकडाऊनमध्ये विनाकारण शहरामध्ये प्रवेशबंदी असेल.

नागरिकांनी सोशल मीडिया, व्हॉट्सॲप ग्रुप व स्थानिक न्यूज चॅनलच्या माध्यमातून मतमोजणीचे निकाल घरबसल्या ऐकावेत. निकालानंतर कुठल्याही प्रकारची रॅली, मिरवणूक काढता येणार नाही. नियमाचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याGokul Milkगोकुळkolhapurकोल्हापूरElectionनिवडणूक