शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

वित्त विभागाच्या मंजुरीनंतरच : पदभरती आदेशावर कार्यवाही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2018 00:08 IST

सहायक प्राध्यापकांच्या पदभरतीचा मार्ग हा वित्त विभागाने आकृतिबंधास अंतिम मंजुरी दिल्यानंतर मोकळा होणार आहे. त्यामुळे

ठळक मुद्देराज्यात सहायक प्राध्यापकांची बारा हजार पदे रिक्त ‘सीएचबी’धारकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

संतोष मिठारी ।कोल्हापूर : सहायक प्राध्यापकांच्या पदभरतीचा मार्ग हा वित्त विभागाने आकृतिबंधास अंतिम मंजुरी दिल्यानंतर मोकळा होणार आहे. त्यामुळे भरतीबाबत शासन आदेशजरी झाला असला, तरी त्याबाबत पुढे कार्यवाही झालेली नाही. भरती प्रक्रिया आगामी अधिवेशनापूर्वी सुरू करावी; अन्यथा राज्यभर पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा पवित्रा नवप्राध्यापक संघटनेने घेतला आहे.

राज्यातील अनेक महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक, सहायक प्राध्यापकांची सध्या सुमारे १२ हजार पदे रिक्त आहेत. दरमहा त्यांमध्ये वाढ होत आहे.गेल्या सहा वर्षांपासून भरती प्रक्रिया बंद असल्याने या जागांवर तुटपुंज्या मानधनावर तासिका तत्त्वावरील (सीएचबी) सहायक प्राध्यापक हे आज ना उद्या कायमस्वरूपी नियुक्ती होईल, या आशेने राबत आहेत.

उच्च शिक्षण संचालनालयाने अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील सहायक प्राध्यापकांची रिक्त पदे भरण्यावरील निर्बंध शिथील केले. त्याबाबतचा आदेशही शासनाने ३ नोव्हेंबर २०१८ रोजी काढला.शासनाने १ आॅक्टोबर २०१७ च्या विद्यार्थिसंख्येवर ४० टक्के रिक्त पदे भरण्यास मान्यता दिली आहे. मात्र, अशासकीय अनुदानित महाविद्यालयांच्या आकृतिबंधास वित्त विभागाची मंजुरी मिळाल्याशिवाय या पदभरतीची प्रक्रिया सुरू होणार नाही. त्यामुळे ‘सीएचबी’धारकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.शिक्षण सहसंचालकांना आदेश नाहीतशिक्षणमंत्र्यांनी या भरतीची घोषणा करून आठवडा उलटला, तरी अद्यापही याबाबत राज्यातील उच्च शिक्षण सहसंचालकांना कोणतेही आदेश अथवा मार्गदर्शक सूचना शासनाकडून मिळालेल्या नाहीत. 

राज्यात सध्या सुमारे १२ हजार सहायक प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. सध्या भरतीसाठी मान्यता मिळालेली पदे कमी असली, तरी भरती करण्याचा निर्णय आमच्यासाठी दिलासादायक आहे. उच्च शिक्षण आणि वित्त विभागाकडून या भरती प्रक्रियेबाबत लवकर कार्यवाही व्हावी. ही प्रक्रिया सरकारने आगामी अधिवेशनापूर्वी सुरू करावी; अन्यथा आमच्या संघटनेतर्फे राज्यभर आंदोलन केले जाणार आहे.- डॉ. संदीप पाथ्रीकर, महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटना.

टॅग्स :Teacherशिक्षकGovernmentसरकार