शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

धरणांत फक्त २३ टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 00:39 IST

नसिम सनदी। लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : उष्णतेच्या लाटेने झालेले बाष्पीभवन आणि निवडणुकीच्या काळात लोकप्रतिनिधींच्या दबावामुळे वाढविलेल्या विसर्गामुळे मे ...

नसिम सनदी।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : उष्णतेच्या लाटेने झालेले बाष्पीभवन आणि निवडणुकीच्या काळात लोकप्रतिनिधींच्या दबावामुळे वाढविलेल्या विसर्गामुळे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच धरणांनी तळ गाठल्याने कोल्हापूर जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट आहे. जिल्ह्याची पिण्याची व पिकांची तहान भागविणाऱ्या चार मोठ्या धरणांतील पाणीसाठा आठवडाभरात तब्बल १०५ दशलक्ष घनमीटरने कमी झाला असून, आजच्या घडीला तो केवळ २३ टक्के उरला आहे. गतवर्षी याच वेळी ३९ टक्के साठा शिल्लक होता. नऊ मध्यम प्रकल्पांतही केवळ ३७ टक्के पाणी शिल्लक राहिल्याने उपसाबंदीची कुºहाडही कोसळली आहे.राधानगरी, दूधगंगा, वारणा, तुळशी यांसारखी चार मोठी धरणे आणि जोडीला नऊ मध्यम आणि ८५ लघु प्रकल्पांमुळे कोल्हापूर जिल्हा पाणीदार आहे. यावर्षी मात्र परिस्थिती वेगळी आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत ४० ते ५० टक्के साठा शिल्लक राहत होता. यावर्षी मात्र पावसाळ्यात सर्वच धरणे ओसंडून वाहूनसुद्धा उपलब्ध साठ्याची बचत करता आली नाही. याला प्रशासकीय गलथानपणा कारणीभूत ठरला आहे. त्यामुळेच मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच धरणांनी तळ गाठण्यास सुरुवात केली आहे.जिल्ह्याचे भवितव्य हातात असणाºया चार मोठ्या धरणांतील पाणीसाठा तर आजवरच्या नीचांकावर पोहोचला असून, एकूण पाण्याच्या २५ टक्क्यांपेक्षाही साठा कमी झाला आहे. मागील वर्षापेक्षा हा साठा २८८.७९ दशलक्ष घनमीटरनी कमी झाला आहे. राधानगरी- १२, तुळशी- ७ , वारणा- २१, दूधगंगा १९ टक्के इतकी तूट गतवर्षीपेक्षाच्या तुलनेत दिसत आहे. त्यातच हवामान विभागाने मान्सूनचे आगमन लांबणार असल्याचे सांगितल्याने हे उपलब्ध पाणी जून महिनाअखेर म्हणून आजपासून दोन महिने पुरवून वापरणे हे पाटबंधारे विभागासमोर मोठे आव्हान असणार आहे. साहजिकच धरणातील विसर्ग, आवर्तन यांवर निर्बंध येत असून, उपसाबंदीही सुरू झाली आहे.आज आंदोलनाचा धडाकाधरणातील साठा एक चतुर्थांशपेक्षाही कमी झाल्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करावे लागणार असल्याने उपसाबंदी सुरू केली आहे; पण त्याची सर्वाधिक झळ पिकांना बसत असल्याने शेतकरी आक्रमक होत आहेत. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्याचे नियोजन शेतकºयांनी केले आहे. आज, सोमवारी इरिगेशन फेडरेशन महावितरण व पाटबंधारे विभागाला जाब विचारणार आहे, तर इचलकरंजीचे कॉ. अप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली इचलकरंजी ते तेरवाड बंधाºयातील पाणी उपसा करण्यास परवानगी देण्यासाठी घेराओ घालणार आहेत.मध्यम प्रकल्प पाणीसाठा(दशलक्ष घनमीटरमध्ये )धरण आजचा टक्केवारी मागील वर्षाचीटक्केवारीकासारी २८.३७ ३६ ३६कडवी ३५.१८ ५० ५४कुंभी ३२.०४ ४२ ४३पाटगाव ३४.५७ ३३ ३२चिकोत्रा १८.१२ ४२ २२चित्री १५.२२ २९ ३८जंगमहट्टी ११.८७ ३५ ४३घटप्रभा १८.०८ ४१ ५६जांबरे ३.४६ १७ ३७मोठ्या धरणांतील पाणीसाठा (दशलक्ष घनमीटरमध्ये)धरण आजचा मागील गतवर्षी आजची मागील वर्षआठवडा आजचा टक्केवारी टक्केवारीराधानगरी ६२.३३ ८०.६६ ८८.२९ २८ ४०तुळशी ३९.३३ ४२.४३ ४५.९६ ४३ ५०वारणा १७६.७६ २१९.३४ ३४०.२७ २३ ४४दूधगंगा १२८.१६ १६९.४२ २२०.८५ १९ ३३एकूण ४०६.५८ ५११.८५ ६९५.३७ २३ ३९