रामन स्पेक्ट्रोमीटर हे पदार्थ विश्लेषणात्मक अभ्यासासाठी एक महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान आहे. अधिविभागातील संशोधक विद्यार्थ्यांना याविषयी सखोल ज्ञान मिळावे या उद्देशाने प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणाअंतर्गत रेनिशॉ यूके सेल्स लिमिटेडचे अभियंते युवराज पाटील यांनी बेंगलोर येथून संशोधक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी उपकरणाची रचना, कार्यपद्धती याबद्दल माहिती दिली. पदार्थविज्ञान अभ्यासाच्या दृष्टीने उपकरण अधिक प्रभावीपणे कसे वापरता येईल, यासंदर्भात मार्गदर्शन केले. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विद्यापीठ व अधिविभाग बंद असताना विद्यार्थ्यांची संशोधकीय मानसिकता विचलित होऊ नये, यासाठी अशा सहज आणि मूलभूत उपक्रमांचे महत्त्व ओळखत विद्यापीठाने हे प्रशिक्षण आयोजित केले. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर येथील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असल्याची माहिती सीएफसी विभागप्रमुख डॉ. आर. जी. सोनकवडे यांनी दिली.
शिवाजी विद्यापीठात रामन स्पेक्ट्रोमीटरचे ऑनलाइन प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:24 IST