शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
4
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
5
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
6
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
7
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
8
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
9
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
10
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
11
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
12
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
13
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
14
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
15
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
16
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

कांदा भडकला, कोथिंबीर आवाक्यात, रताळ्यांची आवक वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 17:44 IST

vegetable, market, kolhapur अनलॉकअंतर्गत निर्बंध शिथिल केल्यानंतर पाच महिन्यांनंतर रविवारी लक्ष्मीपुरीचा आठवडा बाजार भरला. पहिल्याच दिवशी बाजार हाऊसफुल्ल झाला. दसऱ्याच्या निमित्ताने फळांची आवक मोठ्या प्रमाणावर झाली असून, खरेदीसाठीही झुंबड उडाली आहे. रताळ्यांची आवक मोठ्या प्रमाणावर झाली आहे. भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहेत. कांद्याच्या दराने पन्नाशी ओलांडली आहे.

ठळक मुद्दे कांदा भडकला, कोथिंबीर आवाक्यात, रताळ्यांची आवक वाढलीनिर्बंध उठल्यानंतर पहिलाच आठवडा बाजार फुल्ल

कोल्हापूर : अनलॉकअंतर्गत निर्बंध शिथिल केल्यानंतर पाच महिन्यांनंतर रविवारी लक्ष्मीपुरीचा आठवडा बाजार भरला. पहिल्याच दिवशी बाजार हाऊसफुल्ल झाला. दसऱ्याच्या निमित्ताने फळांची आवक मोठ्या प्रमाणावर झाली असून, खरेदीसाठीही झुंबड उडाली आहे. रताळ्यांची आवक मोठ्या प्रमाणावर झाली आहे. भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहेत. कांद्याच्या दराने पन्नाशी ओलांडली आहे.पावसामुळे भाजीपाला कुजल्याने बाजारात टंचाई आहे. तरीदेखील खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. पालेभाज्या कमी प्रमाणात दिसत असून, दरही चढेच आहे. मेथी २५ ते ३० रुपये पेंढी आहे, कोथिंबीरचे दर आवाक्यात आले असून, ३० रुपयांची पेंढी आता १० ते १५ रुपयांवर आली आहे. उपवासासाठी रताळ्यांची मागणी वाढल्याने दरही ३० ते ४० रुपये किलोवर स्थिर आहेत. कांदा ५० ते ६०, लसूण १२०, बटाटा ४० रुपये किलो असा भाव आहे.धान्यबाजार वधारलासणासुदीचा हंगाम सुरू झाल्याने धान्य, कडधान्यांची मागणी वाढते, दरही वाढतात. त्याची सुरुवात बाजारात दिसत आहे. तांदूळ २५ ते ७५ रुपये किलो आहे. ज्वारी ४० ते ५६ रुपये, गहू ३० ते ३८ रुपये आहे. कडधान्यामध्येही दरात वाढच आहे. हरभरा डाळ ७० रुपयांवर स्थिर आहे. मटकी १११०, मसूरा व मसूर डाळ ८०, चवळी ८०, मूग डाळ १०० असे दर चढतच आहेत.भाजीपाला कडाडलाभाजीपाल्याचे दर ८० ते १२० रुपयांवर गेले आहेत. वांगी, दोडका १२० भेंडी, बिन्स, वरणा, कारली ८० रुपये किलो आहेत. टोमॅटो ४० रुपये किलो आहेत. काकडी ३० रुपये किलो आहे. कडीपत्ता, पुदीना १० रुपये पेंढी आहे. फ्लावर ३० ते ५० रुपये नग आहे.फळ बाजारात स्वस्ताईभाजीपाला, धान्यात महागाईने टोक गाठलेले असताना त्या तुलनेत फळबाजारात काहीशी स्वस्ताई नांदत आहे. सफरचंद, डाळिंब, मोसंबी ८० रुपये किलो, केळी २० ते ४० रुपये डझन, चिकू ४० रुपये किलो असा दर आहे. 

धान्य बाजारात आवक कमी आहे. दरात चढउतार आहेत. आता सणावारामुळे मागणी वाढू लागली आहे.अनिल महाजन, धान्य व्यापारी

पाच महिन्यांपासून आठवडा बाजार बंद असल्याने भाजी विक्रीवर मर्यादा होत्या. आता बाजार सुरू झाल्याने भाजी विक्री सुरू केली आहे. घर चालविण्यापुरते पैसे मिळणार असल्याने आनंदी आहे.- आदम मुजावर,भाजी विक्रेता

मी पन्हाळ्याहून भाजी विक्रीसाठी आले आहे. मूळचे बंगळूरचे; पण आम्ही शेतात जंगली वांगे लावले आहे, त्याच्या विक्रीसाठी आले आहे.सन्मती कांबळे, पन्हाळा 

टॅग्स :Marketबाजारvegetableभाज्याkolhapurकोल्हापूर