शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur- अल्पवयीन मुलीचा विनयभंग: एकास ५ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा

By भीमगोंड देसाई | Updated: July 14, 2023 19:21 IST

आरोपी रत्नागिरी जिल्हयातील

कोल्हापूर : अल्पवयीन मुलीचा विनयभंगप्रकरणी यशवंत राजाराम मेणे (वय ४६ रा. अरवली ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी) यास ५ वर्षे सक्त मजुरी व १० हजार रुपये दंडाची शिक्षा शुक्रवारी झाली. जिल्हा व सत्र न्यायधीश एम. बी. तिडके ही शिक्षा सुनावली. याप्रकरणात अॅड अमिता कुलकर्णी यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिले.याबाबत अधिक माहिती अशी की, यशवंत मेणे हा पन्हाळा तालुक्यातील एका गावातील दूध संस्थेच्या टेंपोवर क्लिनर म्हणून कामास होता. ८ फेब्रुवारी २०१५ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास त्याने परिसरातील अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन केले. काही वेळातच पिडीत मुलगी रडत घरी आली व तिने घडलेला प्रकार आईला सांगितला. पिडीतेच्या आईने अन्य नातेवाईकांना याची माहिती दिली. त्यांनी तात्काळ यशवंत मेणे यास याबाबत विचारणा केली. मात्र त्याने सुरुवातीस उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याला नातेवाईकांनी धरुन पोलिसांच्या ताब्यात दिले. पन्हाळा पोलीस ठाण्यात यशवंत मेणे याच्यावर बाल लैंगिक अपराधापासून संरक्षण कलम कायदा १० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. बी. तिडके यांच्यासमोर झाली. यामध्ये सात साक्षीदार तपासले. आरोपी मेणे यास ५ वर्ष सक्तमजुरी व १० हजार रुपये दंडाची शिक्षा आणि दंड न भरल्यास ६ महिन्याची शिक्षा सुनावली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय