शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात धावत्या कारवर कोसळले झाड, चालक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 14:38 IST

नागरीकांनी कारमध्ये अडकलेल्या चालकाला सुमारे अर्धा तासाच्या अथक प्रयत्नानंतर सहिसलामत बाहेर काढले.

कोल्हापूर : येथील महावीर गार्डननजीक रस्त्याकडेला असलेले मोठे झाड अचानक धावत्या कारवर कोसळले. आज, सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. नागरीकांनी कारमध्ये अडकलेल्या चालकाला सुमारे अर्धा तासाच्या अथक प्रयत्नानंतर सहिसलामत बाहेर काढले. त्याला दुखापत झाली आहे. वाहनांची मोठी वर्दळ असलेल्या या रस्त्यावर ही घटना घडल्याने परिसरात खळबळ माजली.जिल्हाधिकारी कार्यालयात कामासाठी येणाऱ्याची मोठी गर्दी असते. दरम्यान, दुपारी एक वाजण्याच्या सुमारास खानविलकर पेट्रोलपंपकडे जाणाऱ्या मार्गावर महावीर गार्डनशेजारी मोठे झाड अचानक उन्मळून रस्त्यावर पडले. हे झाड रस्त्यावरुन धावणाऱ्या एका अलीशान मोटारीवर कोसळले. अचानक झालेल्या या घटनेमुळे परिसरात काहीवेळ गोंधळ उडाला. 

नागरीकांनी व इतर वाहनधारकांनी तातडीने मदतकार्य राबवून त्या मोटारीत सापडलेल्या चालकाची सुमारे अर्धा तासाच्या अथक प्रयत्नानंतर बाहेर काढले. त्यांला दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाचे जवानही तातडीने घटनास्थळी दाखल झाले. महावितरण कर्मचाऱ्यांनीही परिसरातील वीज पुरवठा खंडीत करुन मदत कार्यात सहभाग घेतला. या झाडाखाली फुटपाथवर अनेक दुचाकी व भेलपुरीच्या गाड्या होत्या पण त्या सहिसलामत राहील्या.मोठे झाडच रस्त्यावर पडल्याने जिल्हाधिकारी कार्यालय ते खानविलकर पेट्रोलपंपाकडे जाणारी सर्व वाहतूक बंद झाली, त्यामुळे एकेरी मार्गच सुरु राहीला. तर खानिवलकर पेट्रोलपंपाकडे जाणारी वाहतूक व्हिनस कॉर्नर व महावीर कॉलेज मार्गे वळवण्यात आली. सुमारे दोन तासानंतर झाडाच्या फांद्या तोडून हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्ववत खुला करण्यात आला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर