शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात एक खासदार, तीन आमदार वाढणार; २०२८ ला होणार पुन्हा मतदारसंघांची तोडमोड

By समीर देशपांडे | Updated: June 19, 2025 18:08 IST

नेत्यांकडून अंदाज घेणे सुरू

समीर देशपांडेकोल्हापूर : केंद्र शासनाने जनगणनेची घोषणा केली असून, येणारी लोकसभा आणि विधानसभा नव्या लोकसंख्येच्या आधारावर होणार आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात लोकसभेची एक आणि विधानसभेच्या किमान तीन जागा वाढणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या या निवडणुकांमध्ये जिल्ह्याची राजकीय रचना पुन्हा एकदा बदलणार आहे. याआधी २००९ साली सध्याची मतदारसंघ रचना अस्तित्वात आली होती.२००९ आधी कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभेचे १२ आमदार होते. गडहिंग्लज आणि सांगरूळ हे दोन विधानसभा मतदारसंघ त्यावेळी विसर्जित करण्यात आले. परिणामी जिल्ह्यात विधानसभेच्या दहाच जागा शिल्लक राहिल्या. आता पुन्हा केंद्र शासनाने जनगणनेची घोषणा केली आहे. ती २०२८ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. गेल्या १५ वर्षात लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून, त्याची दखल घेऊन आता हे मतदारसंघ नव्याने तयार करण्यात येणार आहे.

सध्या असलेल्या दहा मतदारसंघांपैकी कमीतकमी मतदारसंख्या असलेला कोल्हापूर उत्तर हा मतदारसंघ असून, सर्वात जास्त मतदार हे कोल्हापूर दक्षिण हा मतदारसंघ आहे. कोल्हापूर उत्तरची मतदारसंख्या ३ लाख १ हजार असून, दक्षिणची मतदारसंख्या ३ लाख ७२ हजार इतकी आहे. कोणत्याही मतदारसंघातील मतदारसंख्येपेक्षा ३० टक्क्यांनी जादा त्या मतदारसंघातील लोकसंख्या असते.सध्याचे विधानसभा मतदारसंघ हे साडेतीन लाख ते चार लाख लोकसंख्येमागे एक असे आहेत, परंतु इतक्या मोठ्या लोकसंख्येला एक आमदार देण्यापेक्षा अडीच लाख लोकसंख्येला एक आमदार असे सूत्र नव्याने ठरत असून, हे सूत्र वास्तवात आल्यास जिल्ह्यात १६ आणि तीन लाख लोकसंख्येला एक आमदार, असे सूत्र ठरवल्यास १३ आमदार संख्या होईल.

नेत्यांकडून अंदाज घेणे सुरूजिल्ह्यातील विद्यमान आमदार, खासदार आणि नेत्यांनी या संभाव्य बदलाचा अंदाज घेण्यास सुरुवात केली असून, काहींनी निवडणूक आयोगातील निवृत्त अधिकाऱ्यांशीही संपर्क साधला आहे. त्यांच्याकडून आपल्या मतदारसंघाचे संभाव्य चित्र काय असू शकते, याचा अंदाज या नेत्यांना आल्याची चर्चा आहे. त्यामुळे काही विभागांकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याची पद्धत या नेत्यांनी अवलंबली आहे.

१२ लाख लोकसंख्येला एक खासदारजिल्ह्याची लोकसंख्या ३८ लाखांहून अधिक असून, १२ लाख लोकसंख्येला एक खासदार असे नवे सूत्र असण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याला लोकसभेचा तिसरा खासदार मिळण्याची शक्यता वाढली आहे.

२०११ नुसार जिल्ह्यातील तालुकावार लोकसंख्या

  • हातकणंगले ४,९४,७४७
  • करवीर ४,८८,४७७
  • शिरोळ ३,२०,१३३
  • पन्हाळा २,५६,२९६
  • कागल २,३०,०७२
  • गडहिंग्लज १,९८,५४९
  • राधानगरी १,९९,७१३
  • चंदगड १,८७,२२०
  • शाहूवाडी १,८०३२२
  • भुदरगड १,५०,३६८
  • आजरा १,२०,२६५
  • गगनबावडा ३५,७७२