याप्रकरणी जयसिंग पांडुरंग चौगुले, बाळासो पांडुरंग चौगुले, ऋषिकेश जयसिंग चौगुले, दिग्विजय बाळासो चौगुले, कृष्णात पांडुरंग चौगुले, अशोक पांडुरंग चौगुले (सर्व रा. विजयनगर, सावर्डे) अशी गुन्हा नोंद झालेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत फिर्याद दीपाली नेताजी चौगुले यांनी दिली आहे, तर यावेळी संशयितांनी केलेल्या मारहाणीत दीपाली चौगुलेसह त्यांचे पती नेताजी चौगुले, पुतण्या सुशांत चौगुले जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावर्डेतील विजयनगर येथील फिर्यादी दीपाली पतीसह शेतात पिकाला
पाणी देण्यासाठी दुचाकीवरून निघाले होते. यावेळी विरोधी गटातील चुलत दीर नातेवाईक असलेले जयसिंग चौगुले यांनी दुचाकी आडवी मारली. त्यामुळे चौगुले दाम्पत्य खाली पडले. यावेळी दोघांत वाद झाला.त्यानंतर सुतार माळ येथे शेतीला पाणी देत असताना संशयित जयसिंगसह अन्य पाचजणांनी चौगुले दाम्पत्याला लाथाक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली.त्यानंतर नेताजी यांना कोयता व काठीने पाठीवर, दंडावर मारहाण केली, तर भांडण सोडविण्यास आलेल्या सुशांत यास मारहाण करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांत रात्री उशिरा तक्रार नोंद करण्यात आली आहे.