शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

म्युकरमायक्रोसिसमुळे एक डोळा निकामी, जगणे झाले मुश्किल; चिपरीतील घोलप कुटुंबीयांच्या मदतीला धावला मराठा समाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2022 12:51 IST

घोलप कुटुंबियांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी चिपरी येथील मराठा समाजाने उचलून माणुसकीचा आधार दिला आहे.

जयसिंगपूर : चिपरी (ता. शिरोळ) येथील चंद्रकांत घोलप यांचा कोरोनामध्ये म्युकरमायक्रोसिसमुळे एक डोळा निकामी झाला आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा गाडा ओढणे मुश्किलीचे बनले होते. या परिस्थितीचा विचार करून त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी चिपरी येथील मराठा समाजाने उचलून माणुसकीचा आधार दिला आहे.

घोलप यांचा मुलगा श्रीतेज (इयत्ता सातवी) व मुलगी संस्कृती (इयत्ता चौथी) या दोघांच्या दहावीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी मराठा समाजाने घेतली आहे. ॲड. विनोद जगदाळे यांनी पुढाकार घेऊन चंद्रकांत घोलप यांच्या कुटुंबाला आधार दिला.यावेळी घोलप कुटुंबीयास आर्थिक मदत देण्यात आली. याप्रसंगी मनोज राजगीरे, किशोर राजगीरे, सुनील पोवार, उमेश पोवार, विशाल पोवार, मोहन पांडव, प्रवीण जगदाळे, विक्रांत भोसले, प्रदीप सूर्यवंशी, युवराज जगदाळे, अरुण जगदाळे यांच्यासह समाजातील पदाधिकारी उपस्थित होते. या मदतीमुळे घोलप कुटुंबीयांना आधार मिळाला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याmarathaमराठा