कोल्हापूर : नागाव फाटा ते हालोंडी असा दुचाकीवरून प्रवास करताना दुचाकी स्लीप होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृ्त्यू झाला. उदय श्रीधर धुमाई (४२, रा. हालोंडी, ता. हातकणंगले) असे मृताचे नाव आहे. रविवारी सायंकाळी ही दुर्घटना घडली. त्याला बेशुध्दावस्थेत कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात दाखल केले होते. या अपघाताची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे.
चक्कर येऊन पडल्याने पत्नी जखमी
कोल्हापूर : पतीसोबत नरंदे ते जयसिंगपूर असा प्रवास करताना कुंभोजनजीक चक्कर येऊन दुचाकीवरून रस्त्यावर पडल्याने पत्नी गंभीर जखमी झाल्याची रविवारी दुर्घटना घडली. उमा हणमंत आंधळे (२४, रा. नरंदें, ता. हातकणंगले) असे जखमीचे नाव आहे. त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दोघे दुचाकीस्वार जखमी
कोल्हापूर : वाकुर्डे (ता. शिराळा, जि. सांगली) येथे भरधाव दुचाकी स्लीप होऊन रस्त्यावर पडल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत संकेत गंगाराम सिरसाट (२३) व दिनेश सदाशिव शिरसाट (२८, दोेघेही रा. शिरसवाडी, ता. शिराळा) हे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले आहे.
अपघातात युवक जखमी
कोल्हापूर : तळंदगे फाटा (ता. हातकणंगले) येथे रस्ता अपघातात युवक जखमी झाला. सुकुमार सुभाष करे (२८, रा. तळंदगे फाटाल ता. हातकणंगले) असे जखमी युवकाचे नाव आहे. ही दुर्घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. अपघाताची नोंद सीपीआर चौकीत झाली आहे.
थांबलेल्या मोपेडला ठोकरले, दुचाकीस्वारावर गुन्हा
कोल्हापूर : रस्ता पार करण्यासाठी कडेला थांबलेल्या मोपेडला एका दुचाकीने धडक दिल्याने वृध्द जखमी झाला. शिवाजीराव श्रीपत निकम (६६, रा. मिरजे गल्ली, कळंब तर्फे ठाणे ता. करवीर) असे जखमी मोपेडस्वाराचे नाव आहे. ही घटना कोल्हापूर ते गारगोटी रोडवर कळंब तर्फे ठाणे येेथे घडली. जखमीवर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी अज्ञात दुचाकीचालकावर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
दाभोळकर चौकातून दुचाकी चोरी
कोल्हापूर : दाभोळकर चौकातून दुचाकीची चोरी झाल्याची घटना घडली. विशाल बापू चौगुले (३५ रा. पाचगाव, ता. करवीर) असे दुचाकी मालकाचे नाव आहे. त्याने आपली सुमारे तीस हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञाताने चोरल्याची तक्रार शाहुपूरी पोलीस ठाण्यात दिली.