शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

व्हेंटिलेटरअभावी रोज एक मरतोय! : सीपीआरमधील वास्तव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 01:10 IST

व्हेंटिलेटरच्या कमतरतेमुळे रोज किमान एका रुग्णाला जीव गमवावा लागत असल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत व्हेंटिलेटरच्या कमतरतेमुळे अत्यवस्थ रुग्णांना खासगी रुग्णालयाचा रस्ता दाखविला जात आहे.

ठळक मुद्देआणखी १२ व्हेंटिलेटरची गरज; अत्यवस्थ रुग्णांना खासगी रुग्णालयाचा रस्ता

तानाजी पोवार ।कोल्हापूर : कोल्हापूरची जीवनवाहिनी म्हणून ओळखला जाणारा थोरला दवाखाना म्हणजेच सीपीआर हॉस्पिटल होय. येथे अनेक मोठमोठ्या शस्त्रक्रिया होतात; पण अपुऱ्या यंत्रसामुग्रीचा फटका सर्वसामान्य रुग्णांना बसू लागला आहे. व्हेंटिलेटरच्या कमतरतेमुळे रोज किमान एका रुग्णाला जीव गमवावा लागत असल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत व्हेंटिलेटरच्या कमतरतेमुळे अत्यवस्थ रुग्णांना खासगी रुग्णालयाचा रस्ता दाखविला जात आहे.

सर्वसामान्यांचा आधारवड असलेल्या सीपीआरमध्ये कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह सीमाभागातील रुग्ण उपचारासाठी येतात. त्यामुळे येथील रुग्णसेवेवर प्रमाणापेक्षा अधिक भार पडत आहे. परिणामी, अनेक यंत्रसामुग्री वारंवार बिघडत आहे. त्यामुळे आता ‘सीपीआर’चेच आरोग्य बिघडत आहे.

एखादा रुग्ण अत्यवस्थ असेल, तर त्याला कृत्रिम श्वास द्यावा लागतो. त्यासाठी व्हेंटिलेटरची आवश्यकता भासते. सध्या सीपीआर रुग्णालयात सुमारे १८ व्हेंटिलेटर आहेत. त्यापैकी मेडिकल आयसीयूमध्ये तीन, सर्जिकल ट्रामा केअरमध्ये १०, कार्डिओ आयसीयू विभागात तीन, तर स्वाईन फ्लू विभागात दोन, अशी व्हेंटिलेटरची संख्या आहे. आणखी १५ व्हेंटिलेटरची सीपीआर’ला आवश्यकता आहे; पण किमान १२ व्हेंटिलेटर उपलब्ध झाले, तर रुग्णसेवेसाठी मोठा दिलासा मिळेल, असाही दावा सीपीआर प्रशासनाकडून केला जात आहे.

विशेषत: अपघात विभागात व्हेंटिलेटरची गरज आहे. वेळेत व्हेंटिलेटर न मिळाल्यास रुग्णांचा मृत्यू होऊ शकतो. यासाठी शासनाकडे मागणी केली होती. त्यानुसार जिल्हा नियोजन मंडळाकडून १२ व्हेंटिलेटर मंजूर झाले आहेत; पण त्याची प्रतीक्षा संपेना. या व्हेंटिलेटरसाठी शासनाने ‘हाफकिन’ या औषधी कंपनीकडे मागणी नोंदविली आहे. त्यांची टेंडर प्रक्रिया सुरू आहे.मेडिकल आयसीयूमध्ये विविध आजारांवर अत्यवस्थ रुग्ण असतात.

प्रत्येकाला व्हेंटिलेटरची गरज असते. याशिवाय डेंग्यू, सर्पदंश, लहान मुले यांनाही व्हेंटिलेटरची आवश्यकता असते. अपुºया व्हेंटिलेटर यंत्रामुळे सीपीआरमध्ये अत्यवस्थ रुग्णांना वाट पाहावी लागते. वेळेत व्हेंटिलेटर न मिळाल्याने रोज एका रुग्णाचा मृत्यू होत असल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे नवीन अत्यवस्थ रुग्ण अ‍ॅडमिट करून घेण्यावर मर्यादा पडत आहेत. त्यांना नाईलाजास्तव खासगी रुग्णालयाचा रस्ता दाखविण्याची वेळ सीपीआरवर आली आहे.जीवन-मरणाचे वेटिंगकाही व्हेंटिलेटरमध्ये अचानक बिघाड होण्याचीही संख्या अधिक आहे. परिणामी, रुग्णाला जीव गमवावा लागत आहे. तर अनेक रुग्णांनाही व्हेंटिलेटरसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. या वेटिंगमध्ये रुग्णांनाही जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे डॉक्टर आणि रुग्णांचे नातेवाईक यांच्यात वादाची ठिणगी पडत आहे.

उपकरणे कालबाह्य : सीपीआर’मधील हृदय शस्त्रक्रिया विभागात आयएफबीपी हे एकच यंत्र आहे. गेल्या २० वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या या यंत्रावर रुग्णसेवेचा अतिभार असल्याने तेही यंत्र आता नादुरुस्त आहे. तर ब्लड बँकेतील रक्त तपासणी यंत्रेही कालबाह्य झाली असल्याने रक्ताची तपासणी बाहेरून करण्याचा सल्ला रुग्णांना दिला जातो. सिटी स्कॅन हे अद्ययावत यंत्र दोन वर्षांपूर्वी खरेदी केले. तर ते चालविण्यासाठी तंत्रज्ञ नसल्याची शोकांतिका आहे. एक्स-रे, सोनोग्राफी यंत्रणाही वारंवार बंद पडत असल्याने ती कालबाह्य झाली आहे.

‘सीपीआर’मधील प्रमुख यंत्रसामग्री व आवश्यकतायंत्रसामुग्री सध्याची संख्या आणखी आवश्यक१) व्हेंटिलेटर १८ १२ (मागणी २०१७-१८)२) सोनोग्राफी २ २३) एक्स-रे २ १४) एमआरआय नाही १ (मागणी केली)५) लॅप्रोस्कोपी १ १६) आयएफबीपी १ (नादुरुस्त) १ (पैसेही भरले)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय