शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

देवस्थानकडून जिल्हा प्रशासनाला एक कोटीचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 16:41 IST

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून जिल्हा प्रशासनाला कोरोना उपाययोजनांसाठी एक कोटीचा निधी देण्यात येणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

ठळक मुद्देदेवस्थानकडून जिल्हा प्रशासनाला एक कोटीचा निधीबैठकीत निर्णय, दोन दिवसात निधी होणार वर्ग

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून जिल्हा प्रशासनाला कोरोना उपाययोजनांसाठी एक कोटीचा निधी देण्यात येणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.जिल्ह्यात कोरोनाचा समूह संसर्ग होत असून, रोज दोनशे-तीनशेच्या संख्येत रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे आता कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी, आरोग्य साहित्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची गरज आहे. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली.

यावेळी मंत्री सतेज पाटील, हसन मुश्रीफ व जिल्हाधिकारी देसाई यांनी कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी एक कोटीचा निधी द्यावा, अशी विनंती केली.समितीने यापूर्वी जिल्हा प्रशासनाला ५० लाख आणि मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी दीड कोटी असे दोन कोटी रुपये दिले आहेत. त्यामुळे वाढीव निधी देण्यासाठी न्याय व विधि खात्याची परवानगी घ्यावी लागेल, असे महेश जाधव म्हणाले. यावर मंत्री पाटील यांनी न्याय व विधि खात्याकडून समितीला कोणतीही अडचण येणार नाही, याची जबाबदारी आम्ही घेतो; तुम्ही तातडीने निधी वर्ग करण्याची कार्यवाही करा, असे सांगितले.

जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, तुम्ही हा निधी शासनालाच देणार आहात; त्यामुळे प्रश्न येणार नाही. त्यानंतर या चर्चेचे प्रोसीडिंग करण्यात आले. पुढील दोन दिवसांत हा निधी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग करण्यात येणार आहे. यावेळी समिती सदस्य शिवाजीराव जाधव, राजेंद्र जाधव उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूरkolhapurकोल्हापूर