शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

साडेसोळा लाखांचे मोबाईल परत : सायबर पोलीस ठाण्याला यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 00:40 IST

मोबाईलमध्ये असलेले सोशल मीडिया अ‍ॅप वेळोवेळी लॉग आॅफ करा. मोबाईल हरविल्यानंतर वैयक्तिक अथवा बँक डिटेल्स दुसऱ्याच्या हाती पडून आर्थिक नुकसान होणार नाही, याची दक्षता घ्या. मोबाईल हरविल्याची तक्रार पोलिसांत द्या.

ठळक मुद्देजिल्हा पोलीसप्रमुखांच्या हस्ते मूळ मालकांना वितरण

कोल्हापूर : जिल्ह्यासह शहराच्या विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून चोरीस गेलेले १६ लाख ५० हजार रुपये किमतीचे ११० मोबाईल परत मिळविण्यात सायबर पोलीस ठाण्यास यश आले असून, ते मूळ मालकांना मंगळवारी सायंकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या हस्ते परत देण्यात आले.

मागील महिन्यात शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांतून ११० मोबाईल चोरीस गेले होते. त्यांचा तपास करण्याचे काम पोलिसांची विशेष शाखा असलेल्या ‘सायबर पोलीस ठाणे’कडे होती. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख व अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत या शाखेने शोधमोहीम राबविली. त्यात ११० मोबाईल शोधून काढले. हे शोधलेले मोबाईल मूळ मालकांकडे सोपविण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यात कागदपत्रांची तपासणी करून ते मोबाईल मंगळवारी त्यांना जिल्हा पोलीस मुख्यालयात जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांच्या हस्ते परत करण्यात आले. या मोबाईलची एकूण किंमत सुमारे १६ लाख ५० हजार आहे.

ही कामगिरी पोलीस निरीक्षक संजय मोरे, स. पोलीस निरीक्षक मंगेश देसाई, उपनिरीक्षक शीतल जाधव, पोलीस कर्मचारी अजय सावंत, सचिन बेंडखळे, अनिल बरगे, अमर वासुदेव, संगीता खोत, सुधीर पाटील, महादेव गुरव, सुरेश राठोड, विशाल पाटील, पूनम पाटील यांनी केली.हरविलेला मोबाईल असा मिळू शकतोमोबाईल विकत घेताना त्याची खरेदी पावती घ्यावी. मोबाईलचा आयएमईआय नंबर नोंद करून ठेवणे गरजेचे आहे. मोबाईलमध्ये असलेला मौल्यवान डाटा संरक्षण करण्यासाठी विशेष सांकेतिक क्रमांक (पासवर्ड) देणे गरजेचे आहे. मोबाईलमध्ये बँकेची माहिती संकलित करू नका. मोबाईलमध्ये असलेले सोशल मीडिया अ‍ॅप वेळोवेळी लॉग आॅफ करा. मोबाईल हरविल्यानंतर वैयक्तिक अथवा बँक डिटेल्स दुसऱ्याच्या हाती पडून आर्थिक नुकसान होणार नाही, याची दक्षता घ्या. मोबाईल हरविल्याची तक्रार पोलिसांत द्या. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliceपोलिस