शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
3
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
4
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
5
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
6
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
7
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
8
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
9
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
10
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
11
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
12
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
13
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
14
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
15
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
16
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
17
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
18
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
19
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
20
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!

‘सिद्धाळा गार्डन’मध्ये दीड डझन उमेदवार रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:30 IST

विनोद सावंत- लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : महापालिका निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक ४६ सिद्धाळा गार्डन हा प्रभाग सर्वसाधरण (खुला) झाल्यामुळे ...

विनोद सावंत- लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : महापालिका निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक ४६ सिद्धाळा गार्डन हा प्रभाग सर्वसाधरण (खुला) झाल्यामुळे येथून दीड डझन उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये आजी, माजी नगरसेवकांसह नवख्यांमध्ये लढत होणार आहे. पक्षांकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर खऱ्या अर्थाने चित्र स्पष्ट होणार आहे. सध्या इच्छुकांकडून गाठीभेटी, हळदी-कुंकूच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे.

शहराच्या मध्यवस्तीमध्ये आणि चार ते पाच मोठ्या तालीम, १५ ते २० प्रमुख तरुण मंडळ असणारा सिद्धाळा गार्डन हा प्रभाग आहे. त्यामुळे मंडळ आणि तालमींच्या पाठिंब्याला येथे महत्त्व आहे. गत निवडणुकीत हा प्रभाग सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यामुळे येथून अनेक मातब्बरांचा पत्ता कट झाला होता. त्यामुळे इच्छुकांनी पत्नींना रिंगणात उतरवले होते. यावेळी प्रभाग सर्वसाधारण झाल्याने येथून १५ पेक्षा जास्त जणांनी फिल्डिंग लावली आहे. अंतिम टप्प्यात कोणाची तलवार म्यान होणार आणि कोण रिंगणात असणार यावरच येथील चित्र स्पष्ट होणार आहे.

गत निवडणुकीमध्ये ताराराणी आघाडी, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये सामना रंगला होता. यामध्ये ताराराणी आघाडीच्या सुनंदा मोहिते यांनी बाजी मारली. काँग्रेसच्या उमेदवाराची डिपॉझिट जप्त झाली होती. गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकासकामांच्या जोरावर यंदाच्या निवडणुकीत मोहिते यांचे पती सुनील मोहिते रिंगणात उतरले आहेत.

माजी स्थायी समिती सभापती सचिन चव्हाण यांनीही या प्रभागातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असून, गाठीभेटी सुरू केल्या आहेत. चव्हाण कुटुंबीयांनी महापालिकेत ८ वेळा प्रतिनिधित्व केले आहे. यामध्ये प्रल्हाद चव्हाण पाच वेळा, सागर चव्हाण एक, सचिन चव्हाण एक आणि जयश्री चव्हाण एक वेळा विजयी झाल्या आहेत. प्रल्हाद चव्हाण आणि सागर चव्हाण यांनी महापौरपद भूषविले आहे. सचिन चव्हाण २०१० ते यांनी २०१५ मध्ये या प्रभागातून प्रतिनिधित्व केले आहे. गतवेळी महिला आरक्षणामुळे त्यांनी निवडणूक लढवली नव्हती. त्यांनी सिद्धाळा गार्डन विकसित केले. परिसरातील २५ ते ३० महिला बचत गटांची स्थापना करून सिद्धाळा महोत्सवाच्या माध्यमातून महिलांना बाजारपेठ उपलब्ध करून आर्थिकदृष्ट्या सक्षम केले. प्रभागात जन्मलेल्या प्रत्येक मुलगीच्या नावे ठेव ठेवण्याचा अनोखा उपक्रमाही सुरू आहे. सिद्धाळा गार्डन येथे शाळांची संख्या जास्त असल्यामुळे वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी स्काय वॉक मंजूर केला. फिरंगाई हॉस्पिटलमध्ये अद्ययावत ब्लड बँक उभारण्यासाठी निधी खेचून आणला. सिद्धाळा गार्डन येथील जागा विना मोबदला महापालिकेला दिली. ते २४ तास नागरिकांसाठी उपलब्ध असणारे नगरसेवक म्हणून प्रभागात परिचित आहेत.

माजी परिवहन समिती सभापती बाबा पार्टे हेही पुन्हा रिंगणात उतरले आहेत. २००० ते २००५ मध्ये त्यांनी या प्रभागातून शिवसेनेतून प्रतिनिधित्व केले आहे. बजापराव माने तालीम हॉल, दत्ताजीराव काशीद हॉल, सणगर गल्ली तालीम हॉल, बोडके गल्ली तालीम हॉलची उभारणी केली. पाण्याचा प्रश्न मार्गी लावला. टोल, हद्दवाड, शिवाजी पूल, खंडपीठ, वीज बिल यासंदर्भात त्यांनी आंदोलने केली. या प्रभागात केलेल्या विकासकामांच्या जोरावर ते निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

उद्योजक अशोक पाटील यांनीही जोमाने प्रचार सुरू केला आहे. ते दत्ताजीराव काशीद महाराज चौक मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष असून, या माध्यमातून सामाजिक काम करत आहेत. प्रॅक्टिस फुटबॉल क्लबचे ते संचालक आहेत. कोरोनात सीपीआरमध्ये पाण्यच्या बॉक्सचे वाटप, नंदवाळ पायी दिंडीवेळी खिचडी वाटप उपक्रम राबवितात. ते काँग्रेसकडून इच्छुक आहेत. अक्षय बाळासाहेब पोवार हे जयशिवराय तरुण मंडळाच्या माध्यमातून सक्रिय असून, शिवसेनेतून त्यांनी उमेदवारी मागितली आहे. भाजपचे दिवंगत नेते रामभाऊ चव्हाण यांची पुतणी आणि शिवाजीराव चव्हाण यांची कन्या सिद्धी गणेश रांगणेकर यांनीही प्रचारामध्ये आघाडी घेतली असून, त्यांनीही शिवसेनेतून उमेदवारी मागितली आहे. भाजपचे मंगळवार पेठ मंडल उपाध्यक्ष वीरेंद्र मोहिते यांनीही सहा वर्षांतील सामाजिक कामाच्या जोरावर उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्यासह माजी नगरसेवक चंदू चिले, गत निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते घेतलेल्या मंदा पाटील यांचे चिरंजीव अजिंक्य पाटील, मिथुन गिरवे, गणेश चिले, चंद्रमोहन पाटील, राजू भोसले, शिवाजी ढवण, सचिन मांगलेकर, राजू पार्टे, शिवाजीराव ढवाण यांच्या नावाचीही चर्चा आहे.

प्रतिक्रिया

विरोधी आघाडीत असतानाही सुमारे अडीच कोटींचा निधी खेचून आणला. सिद्धाळा गार्डनात पावसामध्ये सांडपाणी येत असल्यामुळे २३ लाखांच्या निधीतून नवीन चॅनेल केले. येथे ओपन जीम, पाथवे केले. महाराणी ताराबाई विद्यालयाच्या इमारतीचे २२ लाखांच्या निधीतून नूतनीकरण, प्रयोगशाळा उभारली. याच शाळेतील विद्यार्थ्यांना सहल आणि आरोग्य तपासणी केली. येथेच टर्फ मैदानासाठी पाठपुरावा केला.

सुनंदा मोहिते, नगरसेविका

चौकट

पाच वर्षांतील कामे

डाकवे गल्ली, जासूद गल्ली, चाणक्य गल्ली, बामणी बोळ येथील ड्रेनेज लाईन, पिण्याची पाईपलाईन

लाड चौक ते बजापराव माने तालीम रस्ता

डाकवे गल्ली, खुपिरेकर गल्ली, जरग गल्ली येथील रस्ता

कॅसेट ग्रुप ते सोमेश्वर चौक रस्ता

संपूर्ण प्रभागात एलईडी दिवे

सिद्धाळा गार्डन येथील विहिरीतील गाळ काढला.

चौकट

शिल्लक कामे

गुलाब गल्लीतील रस्त्याची दुरवस्था

कचरा कोंडाळा फाटले, चुकीच्या ठिकाणी बसवले.

पाण्याचा खजिना, पोवार गल्लीत ४० वर्षांपासूनच्या जुन्या ड्रेनेजलाईनमुळे रस्त्यावर सांडपाणी

सणगर गल्लीत ड्रेनेजलाईन टाकली; मात्र रस्ता रखडला.

औषध, धूर फवाणीकडे दुर्लक्ष

चौक़ट

गत निवडणुकीत प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते

सुनंदा मोहिते (ताराराणी आघाडी) १४६५

मंदा पाटील (शिवसेना) ७२६

कल्पना पाटील (राष्ट्रवादी) ६७९

वैशाली पाटील (अपक्ष) ६८२

फोटो : १६०२२०२१ कोल सिद्धाळा गार्डन प्रभाग

ओळी : कोल्हापुरातील सिद्धाळा गार्डन प्रभाग क्रमांक ४६ मधील सोमेश्वर मित्र मंडळ परिसरातील कोंडाळा फाटला असून, रस्त्यावर कचरा पसरत आहे.