शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Crime: वाढदिवशीच वाद; पत्नीवर विळ्याने वार केले, नंतर पतीने गळा कापून जीवन संपवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 11:43 IST

वाढदिवसाचे स्टेटस सोशल मीडियावर

मलकापूर : सावे (ता. शाहूवाडी) येथे पती व पत्नीच्या घरगुती वादातून कृष्णा शिवाजी झेंडे (वय ४७) याने आपल्या वाढदिवसादिवशीच पत्नी राधिकावर धारदार विळ्याने वार करून तिला गंभीर जखमी केले. यानंतर कृष्णा याने विळ्याने आपला गळा चिरून आत्महत्या केली. या घटनेची नोंद शाहूवाडी पोलिसांत झाली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. दरम्यान, राधिकाला पुढील उपचारासाठी सीपीआरमध्ये पाठविले आहे.पोलिसांतून मिळालेली महिती अशी, सावे येथील कृष्णा झेंडे मुंबई येथे खासगी कंपनीत नोकरी करीत होते. ते चार दिवसांपूर्वी सुट्टीवर गावी आले होते. कृष्णा यांचा शुक्रवारी वाढदिवस होता. घरात वाढदिवस साजरा करायची तयारी सुरू असताना कृष्णा व पत्नी राधिका यांच्यात घरगुती वादातून कडाक्याचे भांडण झाले. कृष्णा याला राग अनावर झाल्याने त्याने गवत कापण्याच्या धारदार विळ्याने राधिकावर चार ते पाच वार केले. पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून कृष्णाने विळ्याने आपलाही गळा चिरून आत्महत्या केली. दोघांच्या भांडणाचा आवाज ऐकून शेजारील ग्रामस्थ जमा झाले. या घटनेची महिती शाहूवाडी पोलिसांना मिळताच पोलिसांनी राधिका व कृष्णा या दोघांना मलकापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. राधिका हिच्यावर प्राथमिक उपचार करून तिला सीपीआरमध्ये पाठविण्यात आले. कृष्णा झेंडे यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. कृष्णा याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई असा परिवार आहे.वाढदिवसाचे स्टेटस सोशल मीडियावरकृष्णा झेंडे याचा शुक्रवार १३ जून रोजी वाढदिवस होता. सावे गावातील तरुणांच्या मोबाइलवर व सोशल मीडियावर कृष्णा झेंडेचे फोटो झळकत होते. वाढदिवस साजरा करायच्या अगोदर त्याने पत्नीवर हल्ला केला. नंतर स्वत:ला संपविले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.