शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur- पाणी पुरवठा पुर्ववत करा, अन्यथा तोंडाला काळे फासू; शिवसेना ठाकरे पक्षाच्यावतीने महापालिकेसमोर निदर्शने

By सचिन भोसले | Updated: March 31, 2023 14:27 IST

शहरातील पाणी प्रश्न बनला गंभीर

कोल्हापूर : शहरातील काही भागात दुषित पाणी व कित्येक ठिकाणी अपुरा पाणी पुरवठ्यामुळे पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. येत्या काळात जर पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही. तर गलथान कारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांना महिला शिवसैनिक काळे फासल्याशिवाय गप्प बसणार नाहीत. असा इशारा शुक्रवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने महापालिकेसमोर पाणी प्रश्नासंबधी आयोजित केलेल्या आंदोलनप्रसंगी देण्यात आला.माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापूर शहराचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढण्यासाठी थेट पाईप लाईनच्या माध्यमातून प्रयत्न केले. त्यातही प्रशासनाने चुकीचे मार्गदर्शन करीत अज्ञान सिद्ध केले. सद्य स्थितीत शहरात ठराविक ठिकाणी दुषित पाणी व अपुरा पाणी पुरवठा केला जात आहे. तर काही ठिकाणी दिवसातील २४ तास पाणी पुरवठा केला जात आहे. याबाबत वेळोवेळी प्रशासनास जाब विचारला तर निरुत्तर होते. कोणावरही जबाबदारी ढकलून हात झटकले जात आहेत. नागरीकांची दिशाभुल करून माजी नगरसेवकांना बदनाम केले जात आहे. याबाबत त्वरीत कार्यवाही करून पाणी पुरवठा सुरळीत करावा. अन्यथा पाणी पुरवठा विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांना महिला शिवसैनिक तोंडाला काळे फासल्याशिवाय गप्प बसणार नाहीत. पाणी पुरवठा विभागअधिकारी व प्रशासनाच्या निषेधाच्या घोषणांनी परिसर दणाणला. यादरम्यान शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेत महापालिकेत घुसण्याचा प्रयत्न केला. बंदोबस्तावरील पोलिसांनी प्रवेशद्वारावर आंदोलकांना अडविले. अडविल्यानंतर कार्यकर्त्यांनी तेथेच सोबत आणलेल्या घागरींसह ठिय्या मारला. याबाबतचे निवेदन जल अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी स्विकारले.

यावेळी जिल्हा प्रमुख विजय देवणे, शहर प्रमुख रविकिरण इंगवले, सुनील मोदी, बहुजन परिवर्तन पार्टीचे बाजीराव नाईक, शहर संघटक विशाल देवकुळे, माजी नगरसेवक नियाज खान, माजी नगरसेविका प्रज्ञा उत्तुरे, महिला उपसंघटक स्मिता सावंत, प्रिती क्षीरसागर, दत्ता टिपुगडे, शशिकांत बीडकर, राजू जाधव, युवासेना अधिकारी मंजित माने, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWaterपाणी