शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

कोल्हापूर जिल्हा परिषदेचा नावलौकिक वाढविणाऱ्या जुन्या योजना सुरूच राहतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 13:56 IST

कोल्हापूर जिल्हा परिषदेचा नावलौकिक वाढविणाऱ्या जुन्या चांगल्या योजना याही पुढे सुरू राहतील. नव्या वर्षात आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने येत्या चार महिन्यांत माझ्यासह सर्वांनाच कामाचा वेग वाढवावा लागेल, असे मत जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्हा परिषदेचा नावलौकिक वाढविणाऱ्या जुन्या योजना सुरूच राहतीलअमन मित्तल : ‘सीईओ’पदाचा स्वीकारला कार्यभार

कोल्हापूर : जिल्हा परिषदेचा नावलौकिक वाढविणाऱ्या जुन्या चांगल्या योजना याही पुढे सुरू राहतील. नव्या वर्षात आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने येत्या चार महिन्यांत माझ्यासह सर्वांनाच कामाचा वेग वाढवावा लागेल, असे मत जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी व्यक्त केले.

 त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रवी शिवदास यांनी त्यांचे स्वागत केले. यांनतर दुपारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.मित्तल म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यात मी जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून काम केले आहे. त्यानंतर नाशिक जिल्ह्यात आदिवासी विभागासह वेगवेगळे चार कार्यभार माझ्याकडे होते. शिक्षण, आरोग्य, ग्र्रामीण विकास यंत्रणा, पाणीपुरवठा या विभागांकडे आपले विशेष लक्ष राहणार आहे.जिल्हा परिषदेच्या विविध योजनांबाबत पत्रकारांकडून माहिती घेतल्यानंतर ते म्हणाले, नवीन योजना सुरू करून त्याच्या कार्यवाहीमध्ये वेळ घालविण्यापेक्षा आहेत त्या चांगल्या योजना त्याच पद्धतीने पुढे चालविल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. सकाळी साडेनऊ वाजता त्यांनी सर्व विभागप्रमुखांची प्राथमिक बैठक घेतली. यानंतर दुपारी अध्यक्षा शौमिका महाडिक यांची भेट घेऊन त्यांच्याशीही मित्तल यांनी चर्चा केली.दिवसभर विविध कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मित्तल यांना भेटून शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती. संध्याकाळी पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शिनी मोरे आणि ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रभारी प्रकल्प संचालक सुषमा देसाई यांच्याशी त्यांनी पंचगंगा प्रदूषण व प्रधानमंत्री घरकुल योजनेबाबत चर्चा केली.

माझी मराठी भाषा चांगली होईलमूळचे दिल्लीचे असलेले मित्तल यांचे इंग्रजी, हिंदीवर प्रभुत्व आहे. मात्र, चंद्रपूर आणि नाशिक येथे काम केल्याने ते चांगल्या पद्धतीने मराठी बोलतात. कोल्हापुरात आल्यामुळे माझी मराठी आणखी चांगली होईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. 

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर