शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना रुग्णांची सेवा करणाऱ्या भादवणच्या वृध्दाचा मुंबईत कोरोनानेच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 10:51 IST

मुंबई येथील महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांची सेवा करताना आजरा तालुक्यातील भादवणच्या ५६ वर्षीय वृध्दाला कोरोनानेच जीव गमवावा लागला आहे. मुंबईत नोकरीसाठी गेलेले, वर्षा- दोन वर्षांतून गावी येणाऱ्या वृध्दाच्या मृत्यूने भादवणसह परिसरात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देभादवणच्या वृध्दाचा मुंबईत कोरोनानेच मृत्यूआजऱ्यात आज ७ जण कोरोनाचे पाॅझीटीव्ह रुग्ण

सदाशिव मोरेआजरा :  मुंबई येथील महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांची सेवा करताना आजरा तालुक्यातील भादवणच्या ५६ वर्षीय वृध्दाला कोरोनानेच जीव गमवावा लागला आहे. मुंबईत नोकरीसाठी गेलेले, वर्षा- दोन वर्षांतून गावी येणाऱ्या वृध्दाच्या मृत्यूने भादवणसह परिसरात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, आजऱ्यात आज ७ जण कोरोनाचे  पाॅझीटीव्ह रुग्ण आढळले असून तालुक्यात एकूण ५९ पाॅझीटीव्ह रुग्ण आहेत. या सातजणांपैकी मेढेवाडी येथील २, बहिरेवाडीतील  १, सरोळीतील ३ आणि लाकूडवाडी येथील एकाचा समावेश आहे. लहानपणीच मुंबईत सदरचे गृहस्थ नोकरीसाठी गेले. वडील मुंबईतच असलेने तिथेच शिक्षण घेवून महानगरपालिकेच्या हॉस्पीटलमध्ये नोकरीला लागले. सांताक्रूझ येथे स्थिरस्थावरही झाले. लग्न झाले, दोन मुली झाल्या. त्यांना शिक्षण देत स्वत: नोकरी सुरुच ठेवली.

भादवण या मूळ गावी वर्षा- दोन वर्षांतून नातेवाईकांचे लग्न समारंभ, वास्तुशांती यासह अन्य कार्यक्रमासाठी हे कुटूंब गावी यायचे. गरीबीतून शिक्षण घेवून नोकरी मिळविली. नोकरीच्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम केले.कोरोनाच्या साथीत महानगरपालिकेच्या दवाखान्यात प्रामाणिकपणे काम करुन घरी स्वतंत्र खोलीतच राहत होते. पाच दिवसांपूर्वी ताप आला म्हणून दवाखान्यात दाखविले. दोन दिवसानंतर कोरोनासाठी स्वॅब घेतला. त्यामध्ये ते पॉझीटीव्ह आले. उपचार सुरू असतानाच त्यांचा आज सकाळी मृत्यू झाला. ज्या दवाखान्यात कोरोना रुग्णांची सेवा केली त्याठिकाणीच प्राण सोडण्याची वेळ त्यांच्यावर‌ आली.कोरोना रुग्णांची सेवा करतानाच भादवणच्या वृध्द व्यक्तीचा मृत्यू कोरोनाने झाल्याची माहिती ग्रामस्थांना समजताच गावावर शोककळा पसरली. मुंबईत प्रशासनाने फक्त एकाच व्यक्तीला अंतिम दर्शन घेण्याची परवानगी दिली.पण हे अंत्यदर्शनही पत्नी व मुलींना मिळाले नाही. भादवणसह परिसरातून सदरच्या वृध्दाच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरMumbaiमुंबईhospitalहॉस्पिटल