शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

चप्पलच्या शंभर डिझाईन पाहिल्या... प्राडा म्हणाली, ‘वॉव ‘कोल्हापुरी’ ग्रेट’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 15:54 IST

कुरुंदवाडी, कापशी, पुडा अन् थेट पाकीटमध्ये बसू शकणारी फोल्डिंगची चप्पल पाहून प्राडाच्या अधिकाऱ्यांनी कोल्हापुरी चपलेची वाहवा केली

कोल्हापूर : एकाच लाईनमध्ये असणारी ६० दुकाने, दुकानासमोर स्वच्छता अन् सर्व दुकानांमध्ये लावलेल्या कोल्हापुरी चपलांच्या शंभराहून अधिक डिझाईन पाहून इटालियन प्राडा कंपनीचे अधिकारी बुधवारी अवाक् झाले. आवाज येणारी कुरुंदवाडी, कापशी, पुडा अन् थेट पाकीटमध्ये बसू शकणारी फोल्डिंगची चप्पल पाहून ‘वॉव, ग्रेट कोल्हापुरी’ या शब्दांत प्राडाच्या अधिकाऱ्यांनी कोल्हापुरी चपलेची वाहवा केली.दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या प्राडाच्या टेक्निकल टीमने बुधवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील चप्पल लाईनला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी दुकानदारांशी थेट संवाद साधला. यावेळी पाऊलो टिव्हरॉन, डॅनिएल कोंटू, आंद्रिया पॉलास्ट्रेली, रॉबर्टो पोलास्ट्रेली व ऑड्रिया बॉस्करो यांच्यासह महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे उपस्थित होते.चप्पल लाईनमध्ये आल्यानंतर या टीमने चार दुकानांमध्ये भेटी देत तेथील चपलांच्या विविध डिझाईन पाहिल्या. पुडा, कापशी, कुरुंदवाडी या लाईटवेट चपलांनी या टीमला अक्षरश: भुरळ घातली. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या काळात बनवल्या गेलेल्या काही चपला पाहून या टीमने कारागिरांचे कौतुक केले. यावेळी भूपाल शेटे, शिवाजी पोवार, जयेश ओस्वाल, वसंत पाटील उपस्थित होते.सव्वाशे वर्षांपूर्वी अशी चप्पल बनवली गेली ?येथील दुकानदारांनी कोल्हापूरमध्ये सव्वाशे वर्षांपासून बनवल्या जात असलेल्या काही चपला या टीमला दाखवल्या. त्या चपलांचे डिझाईन पाहून सुरुवातीला या टीमला ते खरे वाटले नाही. दुकानदारांनी त्या काळातले काही फोटो दाखवल्यानंतर या टीममधील सदस्यांनी वॉव, ग्रेट, ग्रेट, कोल्हापुरी ग्रेट म्हणत कारागिरांच्या कलेला दाद दिली. विशेष म्हणजे शाहूकालीन चपला हातात घेऊन ते उशिरापर्यंत न्याहाळत होते.पुडापेक्षा भारी चप्पलप्राडाने त्यांच्या फॅशन शोमध्ये कोल्हापुरी पद्धतीची जी पुडा चप्पल ठेवली होती, ती चप्पलही या टीमने या दुकानांमध्ये पाहिली. मात्र, कोल्हापुरी पद्धतीच्या विविध डिझाईन पाहिल्यानंतर या टीमने पुडा तर काहीच नाही, त्यापेक्षा कितीतरी भारी चप्पल कोल्हापुरात तयार होतात, अशा प्रतिक्रिया दिल्या.