शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘ईएसआयसी’साठी कोल्हापुरात येणार अधिकाऱ्यांची टीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 11:56 IST

येत्या १५ दिवसांमध्ये कोल्हापुरातील ईएसआयसी रुग्णालयामध्ये नवी दिल्लीतील अधिकाऱ्यांची टीम पाठवून संपूर्ण माहिती घेतली जाईल. रुग्णालयाबाबतच्या आवश्यक बाबींची पूर्तता करण्याची ग्वाही केंद्रीय श्रम आणि रोजगारमंत्री संतोष गंगवार यांनी दिली.

ठळक मुद्दे‘ईएसआयसी’साठी कोल्हापुरात येणार अधिकाऱ्यांची टीमसंतोष गंगवार यांची ग्वाही; संजय मंडलिक यांनी मांडला प्रश्न

कोल्हापूर : येत्या १५ दिवसांमध्ये कोल्हापुरातील ईएसआयसी रुग्णालयामध्ये नवी दिल्लीतील अधिकाऱ्यांची टीम पाठवून संपूर्ण माहिती घेतली जाईल. रुग्णालयाबाबतच्या आवश्यक बाबींची पूर्तता करण्याची ग्वाही केंद्रीय श्रम आणि रोजगारमंत्री संतोष गंगवार यांनी दिली.ताराबाई पार्क येथील ईएसआयसी रुग्णालयाच्या दुरवस्थेबाबत खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी संसदेच्या अधिवेशनात तारांकित प्रश्न विचारला. कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांसाठी १0 कोटी रुपये खर्चून हे ईएसआयसी रुग्णालय बांधण्यात आले. या चार जिल्ह्यांतील सभासद कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे सात लाखांपर्यंत आहे. या सभासदांवर अवलंबून असलेल्या परिवारासह सुमारे ३0 लाख रुग्णांना हे रुग्णालय उपयोगी ठरणारे आहे. या कर्मचाऱ्यांचे प्रतिमहिना ठरावीक रक्कम त्यांच्या पगारातून या रुग्णालयाकरिता वर्ग केली जाते.वर्षाकाठी ही रक्कम सुमारे ८५ कोटी रुपये इतकी होते. या रुग्णालयात पुरेसा कर्मचारी वर्ग नसल्याने सर्व वॉर्डरुमला कुलूप लावण्यात आली आहेत. वापर नसल्याने हे रुग्णालय कबुतर, वटवाघूळ, भटक्या श्वानांचा निवारा बनले असल्याचे खासदार मंडलिक यांनी या प्रश्नातून मांडले. त्यावर १५ दिवसांमध्ये ईएसआयसी रुग्णालयामध्ये अधिकाऱ्यांना पाठवून संपूर्ण माहिती घेतली जाईल. त्यातील आवश्यक त्या बाबींची पूर्तता करण्याची ग्वाही केंद्रीय मंत्री गंगवार यांनी दिली.

पूर्ण कार्यक्षमतेने रुग्णालय सुरू व्हावेकर्मचारी सभासदांकडून मोठ्या प्रमाणावर निधी देऊनही या रुग्णालयात सीटी स्कॅन, एक्स-रे, एमआरआय, पॅथोलॉजिकल लॅबोरेटरी व इतर कोणत्याही प्रकारच्या आरोग्य सुविधा कामगारांना मिळत नाहीत. हे रुग्णालय सर्व सोईसुविधांसह पूर्ण कार्यक्षमतेने सुरू व्हावे; यासाठी त्याबाबतचा प्रश्न संसदेत मांडला असल्याची माहिती खासदार मंडलिक यांनी दिली.

माहितीसह व्हिडीओ पाठविलासंसदेतील अधिवेशनात खासदार मंडलिक यांनी ईएसआयसी रुग्णालयाबाबतचा मांडलेला प्रश्न आणि त्यावर केंद्रीय मंत्र्यांनी दिलेली ग्वाही याची माहिती माध्यमांना पत्रकाद्वारे दिली. त्याबाबतचा व्हिडीओदेखील त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना पाठविला. दरम्यान, अशा पद्धतीने माजी खासदार धनंजय महाडिक हे त्यांनी संसदेत मांडलेल्या प्रश्नांची माहिती माध्यमांना देत होते. 

 

टॅग्स :Healthआरोग्यkolhapurकोल्हापूरSanjay Mandalikसंजय मंडलिक