शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत श्रमदानाने अधिकारी-कर्मचाऱ्यांचे संत गाडगेबाबांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 18:53 IST

Swachh Bharat Abhiyan Kolhapur- संत गाडगेबाबा महाराजांच्या कार्याने प्रेरित होऊन दर शुक्रवारी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून श्रमदानाने स्वच्छता मोहीम राबविण्यात येते. हे अभिनंदनीय तर आहेच शिवाय हेच खरे कृतीतून केलेले अभिवादन आहे, असे गौरवोद्गार जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचच्या अध्यक्ष सविता भोसले यांनी काढले.

ठळक मुद्देमध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत श्रमदानाने अधिकारी-कर्मचाऱ्यांचे संत गाडगेबाबांना अभिवादन संत गाडगेबाबा महाराजांचे कार्य प्रेरणादायी- सविता भोसले

कोल्हापूर : संत गाडगेबाबा महाराजांच्या कार्याने प्रेरित होऊन दर शुक्रवारी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून श्रमदानाने स्वच्छता मोहीम राबविण्यात येते. हे अभिनंदनीय तर आहेच शिवाय हेच खरे कृतीतून केलेले अभिवादन आहे, असे गौरवोद्गार जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचच्या अध्यक्ष सविता भोसले यांनी काढले.येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत संत गाडगेबाबा महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन कामगार न्यायालयाचे न्यायाधीश पंकज मैंदर्गी यांच्या हस्ते तर श्रीमती भोसले यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी कामगार न्यायाधीश मैंदर्गी म्हणाले, अधिकारी- कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. सर्वांनीच आपला परिसर स्वच्छ ठेवावा. कोव्हिड -19 च्या पार्श्वभूमीवर आपणा सर्वांना काळजी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. स्वच्छतेबरोबरच या इमारतीमध्ये येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय यासारख्या सुविधाही कराव्यात, असेही ते म्हणाले.जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचच्या अध्यक्ष भोसले म्हणाल्या, श्रमदानाने स्वच्छता मोहीम अधिकारी-कर्मचारी राबवत आहेत. याचा अभिमान वाटतो. अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. संत गाडगेबाबांनी स्वच्छतेचे महत्व सांगितले आहे. त्यांचीच प्रेरणा घेऊन ही स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. या स्वच्छता मोहिमेत सर्वांनीच योगदान द्यावे. वरिष्ठ भू-वैज्ञानिक ऋषीराज गोस्की यांनी यावेळी दर शुक्रवारी राबविण्यात येणाऱ्या स्वच्छता मोहिमेविषयी माहिती दिली. जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते व वरिष्ठ भू-वैज्ञानिक गोस्की यांनीही यावेळी प्रतिमेला पुष्प वाहिले. जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने श्री. मैंदर्गी व श्रीमती भोसले यांना लोकराज्यचा अंक भेट देण्यात आला. यावेळी संजय गांधी निराधार योजनेच्या तहसिलदार मैमुन्नीसा सनदे, उपलेखापाल मदन घुगे, माहिती सहाय्यक एकनाथ पोवार यांच्यासह विविध कार्यालयाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी-कर्मचारी यांनी इमारतीमधील स्वच्छता करून बाबांना अभिवादन केले.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानkolhapurकोल्हापूर