शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

पेन्शन बंद केल्यास कार्यालयाला टाळे : कोल्हापुरात पेन्शनरांचा इशारा भर उन्हात विराट मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 01:33 IST

कोल्हापूर : किमान तीन हजार रुपये पेन्शनमध्ये वाढ करावी

ठळक मुद्दे‘पी. एफ.’चे अधिकारी धारेवर; सरकारवर सडकून टीकाअनेकांनी मोदी सरकारच्या धोरणांवर टीका केली

कोल्हापूर : किमान तीन हजार रुपये पेन्शनमध्ये वाढ करावी, यासह विविध मागण्यांसाठी गुरुवारी दुपारी सर्व श्रमिक संघातर्फे ई.पी.एस. १९९५ च्या पेन्शनरांनी कोल्हापुरात भविष्य निर्वाह निधी (पीएफ) उपविभागीय कार्यालयावर विराट मोर्चा काढला. हातात लाल निशाण, दंडावर निषेधाच्या काळ्या रिबीन बांधून उतरत्या वयाकडे झुकलेल्या पेन्शनरांनी रखरखत्या उन्हाचीही तमा न बाळगता विराट शक्तिप्रदर्शन केले.

भविष्य निर्वाह निधी (पीएफ)च्या सहायक आयुक्त एन. बी. मुल्या यांच्याशी चर्चा करताना प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी, राष्टÑीयीकृत बँकेत बायोमेट्रिकची सोय करा, अन्यथा पेन्शन बंद झाल्यास या उपविभागीय कार्यालयाला टाळे ठोकणार असल्याचा इशारा दिला. अनेकांनी मोदी सरकारच्या धोरणांवर टीका केली. मोर्चात कोल्हापूरसह सांगली, सातारा, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील पेन्शनर सहभागी होते.

मोर्चाचे नेतृत्व अतुल दिघे यांनी केले. मोर्चाला शिवाजी पार्कमधील विक्रम हायस्कूलच्या मैदानावरून प्रारंभ झाला. यावेळी ‘कामगार एकजुटीचा विजय असो’, ‘पेन्शन वाढ मिळालीच पाहिजे’, अशा घोषणा देण्यात आल्या. मैदानावर मोर्चाचे निमंत्रक अतुल दिघे यांचे भाषण झाल्यानंतर मोर्चा प्रथम मध्यवर्ती बसस्थानकाच्या कार्यालयावर काढला. तेथे निदर्शने करून शिष्टमंडळाद्वारे एस. टी.च्या विभागीय अधिकाºयांना निवेदन दिले. हा मोर्चा दाभोळकर चौक, आदित्य कॉर्नर मार्गे ताराबाई पार्कमधील भविष्य निर्वाह निधी कार्यालयावर पोहोचला. आंदोलकांनी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या मारला.

यावेळी द्वारसभेत निमंत्रक अतुल दिघे, आप्पा कुलकर्णी, गोपाळराव पाटील (सांगली), निवास पाटील (वाळवा), पतंगराव मुळीक, एन. एस. पाटील, आदींची भाषणे झाली. मोर्चात अशोक खोत, अशोक कुलकर्णी, भानुदास फारणे, दत्ता सावंत, नाना जगताप, इमाम राऊत, आदी सहभागी झाले होते.काळा दिवसवृद्धापकाळाकडे झुकलेल्या, दूरचे दिसणेही बंद झालेल्या अनेक पेन्शनरांनी मोर्चात सहभागी होताना खांद्यावर लाल निशाण व हाताच्या दंडावर काळ्या पट्ट्या बांधून मोर्चात सहभाग घेतला व हा दिवस ‘काळा दिवस’ म्हणून पाळला.महाराष्टÑाचा पैसा गुजरातलासत्ता आहे तोपर्यंत ओरबडून घेण्याची प्रवृत्ती या सरकारची सुरू असून गुजरात ते मुंबई बुलेट ट्रेन सुरू करून महाराष्ट्रातील सर्व पैसा गुजरातला नेण्याचे पंतप्रधान मोदी यांचे षड्यंत्र आहे. गुजरात-मुंबई ऐवजी पुणे-मुंबई, नागपूर-मुंबई, हैदराबाद-मुंबई अशी बुलेट ट्रेन का सुरू केली नाही? असा प्रश्न पतंगराव मुळीक यांनी सभेत विचारला.कार्यालय विस्कटणारअतुल दिघे म्हणाले, पेन्शनरांना बायोमेट्रिक करण्यासाठी इतर जिल्ह्यातूनही कोल्हापुरात यावे लागत आहे. म्हातारपणी ही पायपीट न झेपणारी असल्याने, तसेच खिशाला न परवडणारी असल्यामुळे ही बायोमेट्रिकची सोय त्या-त्या जिल्ह्यातील तालुक्यात करावी, अशी मागणी केली. तसेच आतापासून पेन्शनर येथे येणार नाहीत, तरीही पेन्शन देणे बंद केल्यास पुन्हा या उपविभागीय कार्यालयावर येऊन हे कार्यालय विस्कटणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.‘म्हाताºयां’ची कदर करा, ‘मोगलाई’चे फतवे बंद कराशिष्टमंडळासोबत चर्चा करताना पी. एफ. कार्यालयातील सहायक आयुक्त एन. बी. मुल्या यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने अतुल दिघे संतापले. म्हाताºयांची कदर तुम्हाला आहे की नाही, कसले फतवे काढता. तुमची मोगलाई येथे खपवून घेणार नाही. आमच्या पैशातून तुमचे पगार होतात, त्यामुळे तुम्ही आमचे कामगार आहात. आम्ही बायोमेट्रिक करणार नाही; पण पेन्शन बंद झाल्यास पुन्हा तुमच्या दारात येऊन तुम्हाला कार्यालयात येणे बंद करीन, असा इशारा दिला.पेन्शनरांच्या मागण्याकिमान तीन हजार रुपयांची वाढ करावीउच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे ६५०० रुपयांवरील पगारावर वर्गणी भरणाºया आस्थापनातील पेन्शनरांना विना अट वाढीव पेन्शनचा लाभ द्यावारेल्वे व बस प्रवासात सवलत मिळावीविधिमंडळावर पेन्शनरांना प्रतिनिधित्व मिळावे.ई.एस.आय.चा लाभ मिळावा.बायोमेट्रिक सिस्टीम भविष्य निर्वाह निधीच्या कोल्हापुरातील उपविभागीय कार्यालयात न ठेवता त्या-त्या जिल्ह्यातील तालुकास्तरावर अगर बँकेतील शाखेत करावे.

टॅग्स :Strikeसंपkolhapurकोल्हापूर