शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
2
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
3
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
4
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
5
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
6
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
7
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
8
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
9
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
10
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
11
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
12
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
13
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
14
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
15
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
16
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
17
अतिवृष्टीमुळे शेतमाल सडला; तुटवड्यामुळे मिरचीचे दर दुप्पट
18
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
19
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
20
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

महाशिवरात्रीनिमित्त शाबू, वरी, केळींना मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 11:24 IST

महाशिवरात्री सणाच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मीपुरीतील रविवारच्या आठवडी बाजारात विशेषत: शाबू, वरी, राजगिरा या उपवासाच्या पदार्थांसह सर्वच प्रकारच्या फळांना मागणी होती. काही भाज्यांच्या दरांत वाढ, तर काही भाज्यांचे दर घसरले होते. दोडका, मुळा, शेवग्याची शेंग, मेथी, चाकवतचा दर निम्म्यावर आला होता. मार्च सुरू झाल्याने उन्हाचा चटका वाढला आहे. त्यामुळे द्राक्षे, अननसाच्या दरांत वाढ झाली आहे.

ठळक मुद्देमहाशिवरात्रीनिमित्त शाबू, वरी, केळींना मागणीदोडका, मेथी, चाकवत निम्म्यावर

कोल्हापूर :  महाशिवरात्री सणाच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मीपुरीतील रविवारच्या आठवडी बाजारात विशेषत: शाबू, वरी, राजगिरा या उपवासाच्या पदार्थांसह सर्वच प्रकारच्या फळांना मागणी होती. काही भाज्यांच्या दरांत वाढ, तर काही भाज्यांचे दर घसरले होते. दोडका, मुळा, शेवग्याची शेंग, मेथी, चाकवतचा दर निम्म्यावर आला होता. मार्च सुरू झाल्याने उन्हाचा चटका वाढला आहे. त्यामुळे द्राक्षे, अननसाच्या दरांत वाढ झाली आहे.कोल्हापुरात कपिलतीर्थ मार्केट, राजारामपुरीतील नार्वेकर मार्केट, शाहूपुरीजवळील रेल्वे फाटक बाजारात सणानिमित्त सकाळपासून ग्राहकांची गर्दी होती. शाबू, रताळे, बटाटा, केळी, वरी, राजगिरा, राजगिरा लाडू खरेदीसाठी गर्दी होती; पण यंदा रताळ्यांची आवक कमी असल्याने दरावर परिणाम झाला होता. रताळे ४० पासून ते ६० रुपयांपर्यंत होते.

शाबू ५७ वरून ६० रुपये प्रतिकिलो, वरी ८० रुपये, बटाटा २५ ते ३० रुपये, राजगिरा ८० रुपये, राजगिरा लाडू पॅकेट (१२ नग) २० रुपये दर होता. तसेच फळांनाही मागणी होती. त्याचे दरही वाढले होते. गेल्या आठवड्यात असलेला सफरचंदांचा ८० रुपयांचा दर १०० रुपयांवर गेला होता.पेरू ८० रुपयांवरून १०० ते १२० रुपयांच्या घरात होता. केळी ३० रुपयांवरून ४० रुपये झाली होती. डाळिंब ८० रुपये असे दर होते. मात्र चिकू व मोसंबीचा दर स्थिर होता. पेरू ४० रुपये तर मोसंबी ८० रुपये होते. सणानिमित्त केळींची आवक मोठ्या प्रमाणात आली होती. त्यामुळे बाजारात केळींचे ढीगच्या ढीग होते.याचबरोबर कोबी, टोमॅटो, गवार, ओला वाटाणा, वरणा, फ्लॉवर, शेवग्याची शेंग, बीट, तोंदलीच्या दरात वाढ झाली आहे; तर वांगी, ओली मिरची, मुळा, ढबू मिरची, कारली, भेंडी, बिनीस, दुधी भोपळा, कांदापात, चाकवताच्या दरात घसरण झाली आहे. तसेच साखर ३६ रुपये, हरभराडाळ ७० रुपये, मूगडाळ ८८ रुपये, मसूरडाळ ६४, उडीदडाळ ८४ ते ८८ रुपये असा दर होता.

काकडी, गाजरात वाढउन्हाचा तडाखा वाढल्याने काकडी, गाजराला ग्राहकांकडून मागणी वाढली आहे. त्यामुळे दरात वाढ झाली आहे. घाऊक बाजारात काकडी २५ रुपये प्रतिकिलो, गाजर २० रुपये किलो असा दर होता. याचबरोबर दह्यालाही मागणी वाढली आहे.

आंब्यांचे दर असे :

  • आंबा हापूस - दोन हजार रुपये पेटी
  • आंबा हापूस- बॉक्स ५०० रुपये
  • आंबा लालबाग- बॉक्स २५० रुपये

 

 

टॅग्स :Marketबाजारkolhapurकोल्हापूर