शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

अश्लील चित्रफीत प्रकरण: ‘त्या’ बोगस डॉक्टरवर तत्काळ कारवाई करा, नागरिकांचा मुरगूड पोलिस ठाण्यावर मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2023 12:27 IST

महिला रुग्णांना फसवून त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवले तसेच याचे व्हिडीओ चित्रीकरण ही केले

मुरगूड : मुरगूड शहराच्या प्रतिष्ठेला धक्का देणाऱ्या शहरातील ‘त्या’ बोगस डॉक्टराला पोलिसांनी तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी शहरातील नागरिकांनी पोलिस स्टेशनवर मोर्चा काढला. यावेळी अनेकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. त्या बोगस डॉक्टरच्या विरोधात घोषणा देत नागरिकांचा मोर्चा एसटी स्टँड मुख्य बाजारपेठ मार्गे पोलिस स्टेशनला आला. यावेळी मागण्यांचे निवेदन नागरिकांनी सहायक पोलिस निरीक्षक विकास बडवे यांना दिले. दरम्यान, त्या अश्लील क्लिप आणि निनावी पत्रे पाठवणाऱ्यांचा पोलिसांनी शोध घ्यावा, अशी मागणी ही यावेळी केली.शहरातील एका बोगस डॉक्टरने आपल्या लाघवी बोलण्याने दवाखान्यात येणाऱ्या महिला रुग्णांना फसवून त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवले तसेच याचे व्हिडीओ चित्रीकरण ही केले. या क्लिप व्हायरल झाल्याने नागरिक कमालीचे संतप्त झाले होते त्यातून आजचा हा निषेध मोर्चा निघाला.निवेदनात संशयित बोगस डॉक्टर आुयर्वेदिक वैद्य म्हणवणारा दत्तात्रय कदम हा असल्याचे म्हटले आहे. पोलिस स्टेशनवर मोर्चा आल्यानंतर पोलिसांनी तो मुख्य गेटवरच अडवला. यावेळी उद्योगपती जोतिराम सूर्यवंशी यांनी या नराधम डॉक्टरामुळे शहराची मोठी बदनामी झाली असल्याचे सांगून पोलिसांनी तक्रार येण्याची वाट न पाहता स्वतः फिर्यादी व्हावे आणि या प्रकरणाची तक्रार दाखल करून त्या बोगस डॉक्टरला अटक करावी, अशी मागणी केली. तर माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके यांनी त्या डॉक्टरने माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य केले असून, इतके होऊन तो दवाखाना सुरू आहे. आपल्या कर्मचाऱ्याद्वारी उपचार सुरू ठेवले आहेत. पोलिसांनी तत्काळ तो दवाखाना बंद करून त्या भोंदूला अटक करावी, अन्यथा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याची जबाबदारी पोलिस प्रशासनाची असेल, असे सांगितले.यावेळी नागरिकांनी निवेदन, त्यासोबत व्हायरल झालेले फोटो, नागरिकांना आलेली निनावी पत्रे पोलिस स्टेशनमध्ये सादर केले. मोर्चावेळी अनुचित प्रकार होऊ नये यासाठी बाजारपेठेमध्ये असलेल्या त्या डॉक्टरच्या घराजवळ मोठा बंदोबस्त लावला होता.तक्रार देण्यास महिलांनी पुढे यावे -याबाबत सहायक पोलिस निरीक्षक विकास बडवे म्हणाले, या प्रकारची चर्चा आपल्यापर्यंत पोहोचली होती. वर्तमानपत्रातील बातम्यांमध्ये बोगस डॉक्टरचे नाव नव्हते, त्यामुळे कारवाई करताना अडचण येत होती; पण लोकभावना लक्षात घेऊन मिळालेल्या निवेदनाद्वारे आपण बोगस डॉक्टरवर कारवाई करतो; पण त्याला जास्तीत जास्त शिक्षा होण्यासाठी महिलांनी न घाबरता तक्रार देण्यासाठी पुढे यावे. त्यांचे नाव गुप्त ठेवून त्यांना पूर्णपणे संरक्षण देऊ. त्यांनी पोलिस स्टेशनला न येता पोलिस घरी जाऊन जबाब घेतील. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरdoctorडॉक्टर