शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर वनवृत्तात ४ कोटी १२ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट : क्लेमेंट बेन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 11:00 IST

  लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर वनवृत्तामध्ये यंदा ४ कोटी १२ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून, त्या ...

ठळक मुद्देकोल्हापूर वनवृत्तात ४ कोटी १२ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट : क्लेमेंट बेनकोल्हापूर जिल्ह्यातील ७५ टक्के झाडे जगल्याचा दावा

 

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूर वनवृत्तामध्ये यंदा ४ कोटी १२ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून, त्या दृष्टीने कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांत तयारी झाल्याची माहिती मुख्य वनसंरक्षक क्लेमेंट बेन यांनी दिली.शासनाच्या ३३ कोटी वृक्षलागवड मोहिमेबाबतच्या तयारीची माहिती देण्यासाठी सोमवारी बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी उपवनसंरक्षक हणमंत धुमाळ, विभागीय वनसंरक्षक सूर्यकांत काटकर आणि विभागीय वनअधिकारी दीपक खाडे उपस्थित होते.बेन म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्याला १ कोटी १३ लाख २२ हजार, साताऱ्यासाठी १ कोटी २४ लाख १ हजार, सांगलीसाठी ७२ लाख ३० हजार, सिंधुदुर्गसाठी ४१ लाख ६६ हजार आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी ४८ लाख ९३ हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यामध्ये वनविभागासोबतच सामाजिक वनीकरण, वनविकास महामंडळ, ग्रामपंचायत आणि इतर शासकीय विभागांसह स्वयंसेवी संस्था यांच्याकडून हे उद्दिष्ट पूर्ण करून घेण्यात येणार आहे.या सर्व जिल्ह्यांमध्ये खड्डे खुदाईची कामे पूर्ण झाली आहेत. याअंतर्गत या जिल्ह्यांमध्ये २३ ओढ्यांच्या दुतर्फा प्रायोगिक तत्त्वांवर ५० हजार बांबूची रोपे लावण्यात येणार आहेत. या कालावधीत ३० सप्टेंबरपर्यंत वनमहोत्सव आयोजित करण्यात आला असून, त्याद्वारे रोपांची विक्री केली जाणार आहे.उपवनसंरक्षक हणमंत धुमाळ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्याला १ कोटी १३ लाख २२ हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट असून, त्यासाठी वन विभाग आणि सामाजिक वनीकरणाकडे १ कोटी २१ लाख ४७ हजार रोपे तयार करण्यात आली आहेत. जिल्ह्यात ४ लाख ४० हजार हरित सेना सदस्यांची नोंदणी करावयाची असून, त्यापैकी ३ लाख ७२ हजार नोंद झाली आहे.................................नवे पारगाव येथे वृक्षारोपण आरंभशासनाचा १ जुलैचा वृक्षारोपण आरंभ हा पारगाव (ता. हातकणगंले) येथील तात्यासाहेब कोरे मिलिटरी अकॅडमी येथे आयोजित करण्यात आला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे........................................झाडे वाळलेली दिसली म्हणजे मेली असे नव्हेगेल्या दोन वर्षांतील वृक्षलागवडीपैकी ७३ टक्के झाडे जगल्याचा दावा यावेळी करण्यात आला. क्लेमेंट बेन म्हणाले, सर्वच १०० टक्के झाडे जगली असा आमचा दावा नाही; परंतु झाडे वाळली म्हणजे ती लगेच मरत नाही. पावसाळ्यात पुन्हा ती जगतात.................................समीर

 

टॅग्स :forest departmentवनविभागkolhapurकोल्हापूर