शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर महानगरपालिकेत ओबीसींना मिळणार २२ जागा, तिसऱ्यांदा आरक्षण सोडत होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2022 18:57 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे पुन्हा नव्याने आरक्षण प्रक्रिया राबवावी लागणार

कोल्हापूर : महानगरपालिका सभागृहाची मुदत संपून तब्बल एकोणीस महिने उलटून गेल्यानंतरही निवडणूक नेमकी कधी होणार याची कल्पना नसली तरी या निवडणुकीसाठी आता तिसऱ्यांदा आरक्षण सोडत काढली जाईल. नागरिकांचा मागास प्रवर्गसाठी (ओबीसी) राजकीय आरक्षण देण्याचा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे पुन्हा नव्याने आरक्षण प्रक्रिया राबवावी लागणार आहे. त्यामुळे नवीन सभागृहात नागरिकांचा मागास प्रवर्गातील २१ ते २२ उमेदवारांना न्याय मिळेल.

महानगरपालिका सभागृहाची मुदत १५ नोव्हेंबर २०२० रोजी संपली. नवीन सभागृह अस्तित्वात येण्याकरिता राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार निवडणूक प्रक्रिया जून २०२० पासूनच राबविण्यात येत होती. परंतु त्याच वर्षी कोरोनाची जागतिक महामारी सुरू झाल्याने राज्यातील सर्वच निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. कोरोनाचा संसर्ग कमी होताच फेब्रुवारी २०२१ मध्ये प्रभाग रचना निश्चित करून आरक्षण प्रक्रिया राबविली गेली.

ओबीसीच्या २२ उमेदवारांना आरक्षण

महानगरपालिका क्षेत्रात नगरसेवकांच्या एकूण ९२ जागा आहेत. त्यातील सत्तावीस टक्क्यांप्रमाणे २५ जागा या ओबीसींच्या वाट्याला येतात. मात्र लोकसंख्येनुसार हा आकडा २१ ते २२ दरम्यान येऊ शकतो. असे जाणकारांचे मत आहे.

अनुसूचित जातीचे प्रभाग तेच राहणार९२ पैकी १२ जागा या अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी आरक्षित राहणार आहेत. अनुसूचित जातीच्या लोकसंख्येवरून बारा जागा निश्चित करण्यात आले आहेत. त्या तशाच राहणार आहेत. परंतु या बारा जागापैकी सहा जागा या महिलांसाठी आरक्षित राहतील. प्रभाग क्रमांक १ अ, प्रभाग क्रमांक ४ अ, प्रभाग क्रमांक ५ अ, प्रभाग क्रमांक ७ अ, प्रभाग क्रमांक ९ अ, प्रभाग क्रमांक १३ अ, प्रभाग क्रमांक १५ अ, प्रभाग क्रमांक १८ अ, प्रभाग क्रमांक १९ अ, प्रभाग क्रमांक २१अ, प्रभाग क्रमांक २८ अ, प्रभाग क्रमांक ३० अ .

आयोगाच्या निर्देशांकडे लक्ष

महापालिका प्रशासनाचे लक्ष आता राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांकडे लागले आहे. नव्याने आरक्षण काढण्याची प्रशासनाची तयारी आहे. आयोगाचे निर्देश येतील त्याप्रमाणे कार्यवाही केली जाईल, असे सांगण्यात आले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूकOBC Reservationओबीसी आरक्षण