शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सिटिझन पोर्टलच्या माध्यमातून आता थेट घरातून तक्रार करा,वेबसाईट सुरू : पोलीस मुख्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 01:00 IST

कोल्हापूर : पोलीस ठाण्यात दाखल होणारे विविध गुन्हे, अटक आरोपी, हरवलेल्या व्यक्ती, अनोळखी मृत व्यक्तींची माहिती आता नागरिकांना घरबसल्या मोबाईलवर

कोल्हापूर : पोलीस ठाण्यात दाखल होणारे विविध गुन्हे, अटक आरोपी, हरवलेल्या व्यक्ती, अनोळखी मृत व्यक्तींची माहिती आता नागरिकांना घरबसल्या मोबाईलवर एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. तसेच फसवणूक, मारामारी, हुंड्यासाठी छळ, ऐवज किंवा मोबाईल हरवला, चोरीस गेला किंवा पोलिसांविरोधात काही तक्रारी असतील तर घरबसल्या आॅनलाईन पद्धतीने त्या नोंदविता येणार आहेत. या तक्रारींद्वारे तत्काळ गुन्हा दाखल करून त्याचा शोध घेतला जाणार आहे. त्यासाठी पोलीस मुख्यालयात स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला आहे. या ठिकाणी चोवीस तास दोन कर्मचारी आॅनलाईन काम पाहत आहेत.

जिल्ह्यात ३० पोलीस ठाणी आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्यात सरासरी दोन-चार गुन्हे दाखल होत असतात. एखादी तक्रार द्यायची असेल तर संबंधित व्यक्ती पोलीस ठाण्याकडे धाव घेते. तेथील ठाणे अंमलदार तक्रार दाखल करून घेण्याऐवजी मार्गदर्शन करण्यातच वेळ घालवितात. अखेर तक्रारदाराची कच्ची नोंद घेऊन गुन्हा रजिस्टरवर आणला जात नाही. गुन्हा दाखल न झाल्याने त्याचा शोधही कोणी घेत नाही. तक्रारदार न्याय मिळेल या अपेक्षेपोटी पोलिसांच्या फोनची वाट पाहत असतो; परंतु आठ ते दहा दिवस उलटले तरी पोलीस ठाण्यातून त्यांच्याशी कोणताही संपर्क साधला जात नाही.

अखेर तक्रारदार पुन्हा पोलीस ठाण्याची वाट धरतात. तिथे चौकशी केली असता समाधानकारक उत्तर मिळत नाही. वेळ, पैसा खर्च होतोच; त्याशिवाय मानसिक त्रासही खूप होतो. त्यामुळे तक्रारदार वैतागून जातो. आता नागरिकांना तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यापर्यंत यावे लागणार नाही, याची काळजी पोलीस दलाने घेतली आहे. त्यांचा वेळ व पायपीट थांबण्यासाठी पोलीस प्रशासनाने ६६६.ेंँंस्रङ्म’्रूी.ेंँं१ं२ँ३१ं.ॅङ्म५.्रल्ल ही वेबसाईट सुरू केली आहे. घरी बसून नागरिकांनी आॅनलाईन तक्रार दिल्यास, तत्काळ तिची दखल घेतली जाणार आहे. त्यामुळे तक्रारदारांची होणारी ससेहोलपट आता थांबणार आहे. त्यांची ही तक्रार आॅनलाईन असल्याने ती राज्यभरातील सर्व पोलीस ठाण्यांत दिसणार आहे.

सिटिझन पोर्टलवर उपलब्ध असणारी माहितीप्रथम खबरी अहवाल पाहणेअटक आरोपींची माहितीहरविलेल्या व्यक्तींची माहितीअनोळखी मृतदेहाची माहितीफरार व्यक्तींची माहितीमहाराष्टÑ पोलीस घटक स्थळांच्या लिंकडाउनलोड (अ‍ॅप्लिकेशन फॉर्म)गुन्हे सांख्यिकी माहितीहरविलेल्या मोबाईलची सूचना देणेदुर्गा उत्सव / गणेशोत्सव परवानगी 

ई-तक्रार केंद्राच्या माध्यमातून महाराष्ट्र सिटिझन पोर्टलच्या वेबसाईटवरून नागरिकांच्या तक्रारी कोणत्याही अडचणीशिवाय संबंधित पोलीस ठाण्यास पाठविल्या जाणार आहेत. नागरिकांना अनेक सुविधांचा लाभ व तक्रार नोंदविण्यासाठीची सुविधा या वेबसाईटवरून घरबसल्या घेता येणार आहे.- संजय मोहिते, पोलीस अधीक्षक, कोल्हापूर 

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेkolhapurकोल्हापूर