शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

आता वनविभागाचाही वाजणार ‘बॅन्ड’, वनगीताचीही रचना होणार

By समीर देशपांडे | Updated: March 21, 2023 11:48 IST

एकीकडे नुकतेच महाराष्ट्र राज्यगीत जाहीर झाल्यानंतर आता वनविभागानेही आपले गीत तयार करण्याचा निर्णय

समीर देशपांडेकोल्हापूर: एकीकडे नुकतेच महाराष्ट्र राज्यगीत जाहीर झाल्यानंतर आता वनविभागानेही आपले गीत तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. एवढेच नाही, तर सांस्कृतिक कार्यमंत्री असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली आता वनविभागाचा ‘बॅन्ड’ही तयार करण्यात येणार आहे. यासाठी खुल्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.राजा बढे लिखित ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ गीताची गेल्या महिन्यात निवड करण्यात आली, तसेच अनेक ठिकाणी पोलिस विभागाचाही स्वतंत्र बॅन्ड असतो. या पार्श्वभूमीवर आता वनगीताचीही रचना करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या या विभागाने स्वत:ची सिग्नेचर वनगीत आणि बॅन्डनिर्मिती करण्याचे निश्चित केले आहे. विविध प्रसंगी प्रोत्साहन आणि स्फुरण देण्याकरिता वाजवता येऊ शकेल, तसेच जे वनविभागाला कोणत्याही सार्वजनिक व्यासपीठावर एक वेगळी ओळख मिळवून देण्यास सक्षम ठरेल, असे गीत निवडण्यात येणार आहे.वनविभागाकडून शाळकरी मुलांसाठी पर्यावरण समस्येबाबत व सद्यस्थितीबाबत विविध उपक्रमांद्वारे माहिती देणे, पर्यावरण संरक्षणाच्या व संवर्धनाच्या प्रत्यक्ष कामांमध्ये सहभागी करून घेणे, यासाठी इको क्लब म्हणजेच हरित सेना हा उपक्रम राबविला जातो. या इको क्लबसाठीही युवा, ज्येष्ठ आणि सामान्य नागरिकांच्या माध्यमातून प्रेरणादायी ठरेल, असे गाणे आणि प्रतिज्ञाही तयार करण्यात येणार आहे. यासाठी एका ऑनलाइन स्पर्धेची घोषणा करण्यात आली असून, ३० एप्रिलपर्यंत याबाबतच्या प्रवेशिका स्वीकारण्यात येणार आहेत.

यासाठी घेण्यात येणार स्पर्धावनगीताचे बोल, संगीतासह इको क्लबसाठी गाणे, फॉरेस्ट बॅन्डसाठी संगीत आणि इको क्लबसाठी प्रतिज्ञा या चार घटकांसाठी खुली स्पर्धा वनविभागाने आयोजित केली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरforest departmentवनविभाग