शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: निवडणुकीतून माघार, तरीही हिशोब सादर करण्याच्या नोटिसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 17:38 IST

उमेदवारांचे भविष्य टांगणीला

कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीतून माघार घेतलेल्या उमेदवारांना जिल्हा प्रशासनाच्या ग्रामपंचायत विभागाकडून शासनाला निवडणूक खर्चाचा हिशोब वेळेत सादर न केल्याने सुनावणीस हजर राहण्याच्या नोटिसा पाठवण्याचा अजब प्रकार झाला आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ज्या उमेदवारांनी निवडणूकच लढवलेली नाही त्यांनी खर्चाचा हिशोब सादर करायचा नसताे. पण, नोटिशीनुसार सुनावणीला आले नाही तर, उमेदवारांची चूक नसताना त्यांच्यावर ६ वर्षे बंदीची टांगती तलवार आहे.जिल्ह्यातील १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२३ या काळात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींची निवडणूक नोव्हेंबर २०२३ मध्ये पार पडली. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार निवडणूक लढवलेल्या उमेदवारांनी निकाल लागल्यापासून एक महिन्याच्या आता निवडणूक खर्च प्रशासनाला सादर करणे बंधनकारक असते. अन्यथा त्यांना ६ वर्षे निवडणूक लढवण्यास बंदी घातली जाते. मात्र हा नियम निवडणुकीतून माघार घेतलेल्या उमेदवारांना लागू नाही. असे असतानाही पन्हाळ्यातील माघार घेतलेल्या उमेदवारांनादेखील नोटीस काढून सुनावणीसाठी १६ जानेवारीस पन्हाळा तहसीलदार कार्यालयात हजर राहण्याची नोटिस काढली आहे. त्यावेळी काहीजणांनी म्हणणे मांडले, पण बाकीच्यांचे राजकीय भविष्य टांगणीला लागले आहे.

पण आदेश नाही..दोन वर्षांपूर्वीच्या निवडणुकीच्या नोटिसा आता कशा याबाबत विचारले असता समजले की, तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या काळात याबाबतची सुनावणी पूर्ण झाली होती. मात्र आदेश झालेला नव्हता. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांची पुन्हा सुनावणी घेण्यास सांगितले.शाहूवाडीत नाही, मग पन्हाळ्यात का?पन्हाळा-शाहूवाडीत एकाचवेळी निवडणूक झालेली असताना शाहूवाडीतील माघार घेतलेल्या उमेदवारांना अशा कोणत्याही नोटिसा आलेल्या नाहीत. मग पन्हाळ्यातच का आल्या हा प्रश्न आहे, म्हणजे कोणत्या तरी एका कार्यालयाकडून चूक झाली आहे. निवडणूक आयोगाचे निर्देश बघता पन्हाळ्याच्या बाबतीतच गफलत झाल्याचे दिसते.

उमेदवारांचे भवितव्य धोक्यात..माघार घेतलेले अनेक उमेदवार आपल्याला खर्च सादर करायचा नाही, म्हणून निर्धास्त आहेत. नोटिस काही जणांना मिळाली, काहींना नाही. ज्यांना मिळाली त्यापैकी काहीजण तहसिल कार्यालयात सुनावणीवेळी निवडणूक आयोगाचे खर्चाच्या सूचनांचे पत्र जोडून म्हणणे सादर केले व त्याची पोच मागितली. मात्र सुनावणी घेतलेल्या कर्मचाऱ्यांनी पोच दिली नाही अशी उमेदवारांची तक्रार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक 2024