शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

घातपात नव्हेच, अंबानींची सहानुभूती मिळविण्याची धडपड; राजू शेट्टी यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 18:12 IST

Raju Shetty Kolhapur- उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्यासमोर जिलेटिनच्या कांड्या सापडणे यामागे कोणताही घातपात नसून, सहानुभूती मिळविण्याचा अंबानी यांचाच प्रयत्न असल्याची टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी बोलताना केली.

ठळक मुद्देघातपात नव्हेच, अंबानींची सहानुभूती मिळविण्याची धडपडराजू शेट्टी यांची टीका

कोल्हापूर : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्यासमोर जिलेटिनच्या कांड्या सापडणे यामागे कोणताही घातपात नसून, सहानुभूती मिळविण्याचा अंबानी यांचाच प्रयत्न असल्याची टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी बोलताना केली.

तीन कृषी कायद्यांमुळे देशभरातील सामान्य जनतेत अंबानी व अदानी यांच्याविरोधात जो रोष तयार झाला आहे, त्यातून डॅमेज झालेली प्रतिमा सुधारली जावी, यासाठीच हा आटापिटा असल्याचे शेट्टी यांनी म्हटले आहे.ते म्हणाले, या प्रकरणातील साऱ्याच घटना संशयास्पद आहेत. गाडी चोरीची आहे. तिथे गाडी लावून जिलेटिनच्या कांड्या ठेवेपर्यंत कुणालाच कसे माहीत झाले नाही, हे गौडबंगाल आहे. पोलीस यंत्रणेचेही हे अपयश म्हणायला हवे. काहीतरी स्टंट करून देशाची सहानुभूती कशी मिळवता येईल, असा प्रयत्न असल्याचे माझे मत आहे.

केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांचे अंबानी व अदानी हेच सर्वाधिक लाभार्थी आहेत. या आंदोलनात आतापर्यंत कित्येक शेतकऱ्यांनी बलिदान दिले. गेले चार महिने हे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे देशभरातील जनतेत या उद्योजकांबद्दल तीव्र संतापाची भावना आहे. ती कमी करण्यासाठी असे काही तरी घडवून आणावे लागते.

महाराष्ट्र पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सत्य उजेडात आणावे. अंबानी यांचे पाठीराखे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून या प्रकरणाचा छडा लावावा, म्हणजे नेमके सत्य जनतेसमोर येईल.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीkolhapurकोल्हापूरFarmer strikeशेतकरी संप