शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटी नव्हे हा तर नवा जिझिया कर, व्यापाऱ्यांची भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 10:55 IST

Gst Kolhapurnews- जीएसटी भरण्यास व्यापाऱ्यांचा नकार नाही. मात्र, चार वर्षांत ९५० हून अधिक बदल केले आहेत. त्यात प्रत्येक वेळी नवीन सुधारणा झाली की त्याची वसुली मागील तारखेप्रमाणे व्यापाऱ्यांकडून केली जाते. त्यामुळे हा कर म्हणजू जिझिया कर वाटू लागला असल्याची संतप्त भावना व्यापाऱ्यांतून व्यक्त होत आहे. कावीळ झालेल्या माणसाला जग पिवळे दिसते. त्याप्रमाणे केंद्र सरकार कर चुकवेगिरी करणाऱ्या दोन-चार जणांची शिक्षा सर्वांना का देत आहे, असा सवालही त्यांच्याकडून विचारला जात आहे.

ठळक मुद्दे जीएसटी नव्हे हा तर नवा जिझिया कर, व्यापाऱ्यांची भावनादंड अन् व्याजाच्या नोटीसने नकोसा झाला व्यवसाय

कोल्हापूर :जीएसटी भरण्यास व्यापाऱ्यांचा नकार नाही. मात्र, चार वर्षांत ९५० हून अधिक बदल केले आहेत. त्यात प्रत्येक वेळी नवीन सुधारणा झाली की त्याची वसुली मागील तारखेप्रमाणे व्यापाऱ्यांकडून केली जाते. त्यामुळे हा कर म्हणजू जिझिया कर वाटू लागला असल्याची संतप्त भावना व्यापाऱ्यांतून व्यक्त होत आहे. कावीळ झालेल्या माणसाला जग पिवळे दिसते. त्याप्रमाणे केंद्र सरकार कर चुकवेगिरी करणाऱ्या दोन-चार जणांची शिक्षा सर्वांना का देत आहे, असा सवालही त्यांच्याकडून विचारला जात आहे.कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे १ लाख २७ हजारांहून अधिक व्यापारी जीएसटी नोंदणीकृत आहेत. मात्र, त्यांना सरकार सापत्न वागणूक देत आहे. जुलै २०१७ ला हा कर लागू केल्यापासून महिन्याला २१ अधिसूचना विभागाने जारी केल्या आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक वेळी अधिसूचना जारी केल्यानंतर त्याची अंमलबजावणी मागील तारखेपासून केली जाते. त्यामुळे दंड आणि त्यावरील व्याज असे भरमसाठ पैसे व्यापाऱ्यांना जबरदस्तीने भरावे लागत आहेत.

परताव्याचा अर्ज वेळेत दाखल केला नाही तर खरेदीदाराला दुप्पट कर भरावा लागत आहे. तांत्रिक कारणाने विलंब झाला तरी दंड आणि व्याज काही केल्या सुटत नाही. कोरोनानंतर व्यापाऱ्यांचा व्यवसायातील नफा अगदी ३ ते ६ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. कर मात्र त्याच्या तीन अथवा सहापटही भरावा लागत आहे. एक दिवस जरी व्यापार काही कारणाने बंद राहिला तर अनेकांना बाजारातील पत कमी होण्याची भीती वाटते. त्यामुळे जीएसटी विभागाकडून होणाऱ्या कारवाईमध्ये कधी बँक अकाउंट सील, तर कधी मालमत्ता जप्ती याचा समावेश आहे.

अशी कारवाई करताना विभागाने किमान १५ दिवसांची नोटीस व्यापारी, व्यावसायिकांना देणे गरजेचे आहे. अशीही अपेक्षा व्यापाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे कोरोना लॉकडाऊनमुळे सर्वच प्रकारचे व्यवसाय डबघाईला आले आहेत. यापूर्वी जीएसटी कौन्सिल असताना कोर्टात दाद मागता येत होती. आता कायदाच केल्यामुळे दाद मागण्याचा दरवाजा बंद झाला आहे. या सर्व बाबींमुळे व्यापारी वर्गात संतप्त भावना व्यक्त होत आहेत. कॅट, चेंबर कॉमर्ससह विविध व्यापारी संघटनांनी शुक्रवारी एक दिवसीय बंद यशस्वी करण्यासाठी या संस्थांचे पदाधिकारी तालुका स्तरावर भेटीगाठी घेत आहेत.अशी अंमलबजावणी नको

  • शून्य, पाच, बारा, १८ आणि २८ अशा पाच प्रकारांत जीएसटीची अंमलबजावणी नको
  •  रिटर्नला विलंब झाल्यानंतर एकतर्फी ई-वे बिल बंद अथवा निलंबित करू नये.
  • रिटर्नमध्ये चूक सुधारण्यासाठी संधी द्यावी.
  •  सहा महिन्यांच्या परताव्याची पडताळणी करून तो व्यापाऱ्याना दिला पाहिजे.

व्यापारी व्यावसायिकांना हा कर भरणे क्रमप्राप्त असले तरी ही कर प्रणालीची रचना सुटसुटीत करावी. सर्वच व्यापारी चोर असल्यासारखी वागणूक शासनाने देऊ नये, अन्यथा आंदोलनाशिवाय व्यापाऱ्यांकडे पर्याय नाही.- संजय शेटे,अध्यक्ष, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स ॲन्ड इंडस्ट्रीज

टॅग्स :GSTजीएसटीkolhapurकोल्हापूर