शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

१ मार्चपासून असहकार आंदोलन फसवी कर्जमाफी : शेतकरी सुकाणू समितीत निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 01:27 IST

कोल्हापूर : राज्य सरकारच्या कर्जमाफीत आतापर्यंत केवळ १० ते १५ टक्के शेतकºयांना लाभ झाला असून, ही कर्जमाफी पूर्णत: फसवी आहे. या विरोधात संपूर्ण राज्यात रान उठविणार असून

कोल्हापूर : राज्य सरकारच्या कर्जमाफीत आतापर्यंत केवळ १० ते १५ टक्के शेतकºयांना लाभ झाला असून, ही कर्जमाफी पूर्णत: फसवी आहे. या विरोधात संपूर्ण राज्यात रान उठविणार असून, त्याची सुरुवात १ मार्चपासून असहकार आंदोलनाने करण्याचा निर्धार शेतकरी सुकाणू समितीच्या बैठकीत करण्यात आला.

जिल्हा शेतकरी सुकाणू समितीची बैठक शुक्रवारी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात झाली. अध्यक्षस्थानी माजी आमदार संपतराव पवार होते. शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष रघुनाथदादा पाटील म्हणाले, कर्जमाफी म्हणजे डोंगर पोखरून उंदीर काढल्यासारखा प्रकार आहे. सरकार व मंत्री हजारो कोटींच्या कर्जमाफीची भाषा करीत सुटले आहेत; पण शेतकºयांच्या हातात अद्याप दमडीही पडलेली नाही.

सरकारने पाठविलेल्या हिरव्या यादीतील शेतकºयांची नावे पाहिली तर यामध्ये धनदांडगे, कर्जबुडव्यांचा भरणा अधिक असून त्यामुळे प्रामाणिकपणे परतफेड करणारे शेतकरी हडबडले आहेत. यावरून कर्जमाफीचे धोरण फसवे आहे, हेच सिद्ध होते. असहकार आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला शुद्धीवर आणावे लागणार आहे. आंदोलनाची सुरुवात इस्लामपूर येथून होणार असून सरकारचे कोणतेही कर, वीज बिल शेतकरी भरणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. यावेळी अतुल दिघे, अ‍ॅड. माणिक शिंदे, गणेशकाका जगताप, किशोर ढमाले, बाबासाहेब देवकर, आदी उपस्थित होते.२३ मार्च रोजी हुतात्मा दिन पाळणारसंपतराव पवार म्हणाले, कर्जबाजारीपणाला कंटाळून १९ मार्च १९८६ रोजी साहेबराव करपे या शेतकºयाने विष प्र्राशन केले. सरकारला याची आठवण करून देण्यासाठी राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर उपोषण करण्यात येणार आहे. हा दिवस ‘अन्नत्याग दिन’ म्हणून पाळण्यात येणार आहे. त्याचबरोबर २३ मार्च हा ‘शेतकरी हुतात्मा दिवस’म्हणून पाळण्यात येणार असून, प्रमुख शहरांतून संघर्षयात्रा काढण्यात येणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरStrikeसंप