शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘अनाहूत’ लघुपटाचे फिल्मफेअरसाठी नामांकन : बगाडे, मतदानाचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 19:32 IST

चित्रपटसृष्टीची गंगोत्री असलेल्या कोल्हापूरमधील कलाकार आणि तंत्रज्ञांनी बनविलेल्या ‘अनाहूत’ या लघुपटाचे फिल्म जगतातील नामांकित फिल्मफेअर अवॉर्डसाठी नामांकन झाले आहे. फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळणारा हा कोल्हापूरचा पहिलाच लघुपट असल्याची माहिती दिग्दर्शक उमेश बगाडे यांनी गुरुवारी दिली. ​​​​​​​

ठळक मुद्दे‘अनाहूत’ लघुपटाचे नामांकित फिल्मफेअर अवॉर्डसाठी नामांकन फिल्मफेअरसाठी नामांकन मिळणारा कोल्हापूरचा पहिलाच लघुपट : उमेश बगाडे लघुपटाला सोशल मीडियावर भरपूर लाईकवास्तववादी लैंगिक शिक्षण’ विषय मनाला भिडणारा

कोल्हापूर : चित्रपटसृष्टीची गंगोत्री असलेल्या कोल्हापूरमधील कलाकार आणि तंत्रज्ञांनी बनविलेल्या ‘अनाहूत’ या लघुपटाचे फिल्म जगतातील नामांकित फिल्मफेअर अवॉर्डसाठी नामांकन झाले आहे. फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळणारा हा कोल्हापूरचा पहिलाच लघुपट असल्याची माहिती दिग्दर्शक उमेश बगाडे यांनी गुरुवारी दिली.ते म्हणाले, आमच्या अ‍ॅडव्हेंचर्स निर्मिती संस्थेचा हा सहावा लघुपट आहे. गतवर्षी ‘चौकट’ या लघुपटाचे कान्स, इटलीतील लोकप्रिय चित्रपट महोत्सवात कौतुक झाले. दोन महिन्यांपूर्वी बनविलेल्या ‘अनाहूत’ लघुपटालाही सोशल मीडियावर भरपूर लाईक मिळत आहेत.

फिल्मफेअर साठी १९०० लघुपट आले होते. त्यापैकी केवळ ५७ लघुपट अंतिम फेरीत पोहोचले असून त्यात अनाहूतचा समावेश आहे. फिल्मफेअर व्यवस्थापनाने अन्य पुरस्कार स्पर्धेबरोबरच पिपल्स चॉईस स्पर्धेसाठी या लघुपटाची निवड केली आहे. त्यामुळे जास्ती जास्त लोकांनी लिंकद्वारे लघुपटासाठी मतदान करावे.समिधा गुरू म्हणाल्या, ‘लैंगिक शिक्षण’ या विषयावर कधी बोललं जातं नाही. असा विषय घेऊन हा लघुपट बनविण्यात आला आहे. समाजाची गरज लक्षात घेऊन एक चांगला विषय हाताळला आहे. जास्तीत जास्त लोकांनी हा लघुपट बघून लघुपटाला मतदान करावे.

छायाचित्रण प्रमुख अभिषेक शेटे म्हणाले, वास्तववादी विषय हा मनाला भिडणारा आहे हे यश आहे आमचं हा अभिमानाचा भाग आहे. पत्रकार परिषदेस रचना जगदाळे, संदीप गावडे, धनंजय पाटील, विजय कुलकर्णी,अमर कांबळे, सौरभ प्रभुदेसाई उपस्थित होते. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरentertainmentकरमणूक