शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
2
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
3
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
4
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
5
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
6
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
7
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
8
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
9
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
11
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
12
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
13
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
14
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
15
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
16
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
17
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
18
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
19
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
20
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’

मच गया शोर...सारी नगरी रे !

By admin | Updated: September 7, 2015 00:49 IST

शहरात दहीहंडीचा थरार : गोविंदाची धडपड; ढोल-ताशांचा गजर, डीजेचा ठेका; प्रेक्षकांचा उत्साही प्रतिसाद

कोल्हापूर : आभाळाशी स्पर्धा करणारे उंचच उंच थर.. डोक्याला पट्ट्या बांधलेले गोविंदा... ‘गोविंदा-गोपाळा’चा, ढोल-ताशांचा गजर, डीजेचा ठेका व हजारो कोल्हापूरकरांच्या उपस्थितीत रविवारी दहीहंडी फोडण्याचा सोहळा उत्साहात पार पडला. रविवारी सुटी असल्याने सायंकाळनंतर शहरवासीय कुटुंबीयांसोबत दहीहंडीचा थरार पाहण्यासाठी घराबाहेर पडले. शहरातील लाखमोलाच्या दहीहंडी फोडण्यासाठी विविध पथके दुपारी एक वाजल्यापासून कोल्हापुरात दाखल होण्यास सुरुवात झाली होती. दहीहंडीचा सोहळा आयोजित केलेल्या मंडळांकडे नावनोंदणी तसेच तेथील दहीहंडीचा अंदाज घेऊन गोविंदा पथके अन्य ठिकाणी जात होती. दुपारी तीननंतर दहीहंड्या फोडण्यासाठी ट्रक, टेम्पो आणि मोटारसायकलींचा ताफा घेऊन ते शहरातून फिरत होते. शहरातील दसरा चौक, गुजरी, शिवाजी चौक, राजारामपुरी मेन रोड, गंगावेश, लक्ष्मीपुरी, पितळी गणेश मंदिर चौक या ठिकाणी होणाऱ्या दहीहंडीच्या उत्सवाची आयोजकांकडून सकाळपासून तयारी सुरू होती. सर्व मोठ्या दहीहंडी आयोजक मंडळांना यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीतील इच्छुकांनी प्रायोजकत्व देण्याची संधी सोडली नाही. त्यांची छबी या दहीहंडी उत्सवावर दिसून आली. ‘दहीदंडी’वर पोलिसांनी ठेवली नजरकोल्हापूर : शहरात ३७ ठिकाणी ‘दहीहंडी’च्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर रविवारी दुपारनंतर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वाहतुकीची कोंडी होऊन कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी शहर वाहतूक शाखेच्यावतीने शिस्तबद्ध नियोजन केले होते. गर्दीच्या ठिकाणी प्रत्येक संशयित व्यक्तीच्या हालचालींवर साध्या वेशातील पोलीस नजर ठेवून होते. शहर पोलीस उपअधीक्षक भारतकुमार राणे यांनी स्वत: शहरातील सर्व दहीहंडी कार्यक्रमस्थळांना भेटी देऊन पाहणी केली. गर्दीचा फायदा घेत पाकीटमार किंवा चेन स्नॅचरवर लक्ष ठेवण्यासाठी साध्या वेशातील पोलिसांची नेमणूक करण्यात आली होती. लक्ष्मीपुरी १८, राजारामपुरी ९, जुना राजवाडा ६, शाहूपुरी ४ असे दहीहंडीचे कार्यक्रम झाले. १ शहर पोलीस उपअधीक्षक , ४ पोलीस निरीक्षक , ६ सहायक पोलीस निरीक्षक,२५ वाहतूक पोलीस, २० होमगार्ड ,१ स्ट्रायकिंग फोर्स तुकडी बंदोबस्तासाठी कार्यरत होती.शहरात प्रचंड कोंडीया उत्सवाचा सर्वाधिक फटका वाहनधारकांना बसला. गोविंदा पथकांच्या वाहनांची प्रमुख मार्गांवर गर्दी झाल्यामुळे वाहनधारकांना कसरत करतच वाट काढावी लागत होती. एकेका दुचाकीवर तिघे-चौघेजण वाहतूक पोलिसांसमोरून भरधाव वेगाने जात असल्याचे चित्र शहरात दिसत होते. ‘गोकुळ’ची दहीहंडी शिरोळच्या पथकाने फोडली कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाची (गोकुळ) दहीहंडी फोडण्याचा मान शिरोळच्या नृसिंह कुटवाड गोविंदा पथकाने मिळविला. त्यांनी ५१ हजारांचे बक्षीस पटकावले. ‘गोकुळ’ दूध संघाच्यावतीने प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही दहीहंडीचा कार्यक्रम पितळी गणपती चौकात आयोजित केला होता. दहीहंडीचा प्रारंभ अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या हस्ते व संचालक अरुण डोंगळे, विश्वास जाधव, रामराजे कुपेकर, बाबा देसाई, जयश्री पाटील-चुयेकर, अमरिश घाटगे, उदय पाटील, कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावर्षी दहीहंडी फोडण्यासाठी अजिंक्यतारा- शिरोळ, नृसिंह - कुटवाड, गोडी विहार - शिरोळ, शिवगर्जना - तासगाव, हनुमान - शिरोळ, रासलिंग- राशिवडे या सहा मंडळांनी सहभाग घेतला. यामध्ये नृसिंह- कुटवाड या गोविंदा पथकाने एकावर एक असे सहा मनोरे रचून दहीहंडी फोडली. गुजरीची दहीहंडी पाचव्या वर्षीही ‘गोडी विहीर’ कडेसलग पाचव्या वर्षी शिरोळचे गोडी विहीर तालीम मंडळ महाद्वार रोड येथील गुजरी मित्रमंडळाची दहीहंडी फोडत एक लाखाचे मानकरी बनले. २५ फुटांवरील ही दहीहंडी पाच थर लावून गोडी विहीरच्या गोविंदानी फोडली. सहा वाजता देश-विदेशांत कार्यक्रम करणाऱ्या मुंबईच्या आविष्कार ग्रुपच्या डान्स शोमुळे वेगळीच रंगत आणली होती. दहीहंडी पाहण्यासाठी मंडळांतर्फे महिलांसाठी बसण्याची वेगळी व्यवस्था केली होती. एकूण सात मंडळांनी यामध्ये सहभाग घेतला होता. दहीहंडीचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते झाले. या दहीहंडीचे नियोजन अध्यक्ष किरण नकाते, कार्याध्यक्ष हर्षल कटके, अमर नकाते, नियाज नणंदीकर, सागर राशिंगकर, संतोष खोगरे, विजय सूर्यवंशी, सचिन सूर्यवंशी आदींनी केले होते.शिवाजी चौकातील दहीहंडी ‘शिवगर्जना’ने फोडली शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी चौक संयुक्त मित्रमंडळाची दहीहंडी तासगाव येथील शिवगर्जना गोविंदा पथकाने फोडली. सहाव्या थरावर आकाश इंगवले या गोविंदाने ही दहीहंडी फोडली. यंदा बक्षिसातील रक्कम कमी करून पन्नास हजार रुपये दुष्काळग्रस्त भागात चारा वाटण्यासाठी मंडळाच्यावतीने देण्यात आले. दहीहंडीचे उद्घाटन आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते झाले. गंगावेशची दहीहंडी रासलिंगने फोडलीगंगावेश येथील भाऊ नाईक गल्ली सांस्कृतिक मंडळाची पंधरा हजारांची दहीहंडी राशिवडे खुर्द (बेले ता. राधानगरी) च्या रासलिंग गोविंदा पथकाने फोडली. सात थर उभे करून ही दहीहंडी फोडण्यात आली. यावेळी अर्चना सावंत यांच्या ‘अप्सरा आली’ या लावणीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होेते. उद्घाटन आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष विक्रम खोत, अमोल गायकवाड, संभाजी भोसले, तुषार गवळी आदी उपस्थित होते.