शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

अनंत चतुर्दशीदिवशीच्या ध्वनिप्रदूषणात यंदा कमालीची घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 16:46 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील तरुण मंडळांनी अनंत चतुर्दशी दिवशी (मंगळवारी) साध्या पद्धतीने बाप्पांचे विसर्जन केले. त्यामुळे शहरातील ध्वनिप्रदूषणात यंदा कमालीची घट झाली आहे. शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाच्या पाहणीतून दिसून आले आहे. या पाहणीमधील निरीक्षणांबाबतच्या अहवालाची माहिती या विभागाने दिली.

ठळक मुद्देसाध्या पद्धतीने विसर्जनाचा परिणाम शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाकडून पाहणी

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील तरुण मंडळांनी अनंत चतुर्दशी दिवशी (मंगळवारी) साध्या पद्धतीने बाप्पांचे विसर्जन केले. त्यामुळे शहरातील ध्वनिप्रदूषणात यंदा कमालीची घट झाली आहे. शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाच्या पाहणीतून दिसून आले आहे. या पाहणीमधील निरीक्षणांबाबतच्या अहवालाची माहिती या विभागाने दिली.पर्यावरणशास्त्र विभागाच्या प्रभारी प्रमुख डॉ. ए. एस. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधक विद्यार्थी चेतन भोसले, अजय गौड, एम. एस्सी. अभ्यासक्रमाचे विद्यार्थी योगेश गलगले, अनिकेत मोराळे ध्वनी पातळी मापनाचे काम केले. त्यांनी शांतता, रहिवासी, व्यावसायिक, औद्योगिक या क्षेत्रांमध्ये २२ परिसरामध्ये मापन केले.

ध्वनिमापक उपकरणाद्वारे डेसिबल या एककात त्यांनी मोजमाप केले. यावर्षी शांतता क्षेत्रातील सीपीआर, न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालय, शिवाजी विद्यापीठ आणि रहिवासी क्षेत्रातील उत्तरेश्वर पेठ, शिवाजी पेठ, ताराबाई पार्क, व्यावसायिक क्षेत्रातील पापाची तिकटी, गंगावेश येथील ध्वनी पातळी ही केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) मानकांपेक्षा थोडी वाढलेली आहे. पण, गेल्यावर्षी पेक्षा या ध्वनी पातळीमध्ये कमालीची घट झाली आहे.यंदाची ध्वनी पातळी (डेसिबलमध्ये)         

क्षेत्र                       परिसर          ध्वनीपातळी

  • शांतता               सीपीआर              ५५.९७

                                न्यायालय          ४६.५१                   जिल्हाधिकारी कार्यालय  ४५.६२                    शिवाजी विद्यापीठ        ४१.७३

  • निवासी             राजारामपुरी         ३९.४७

                             उत्तरेश्वर पेठ      ४६.५२                                 शिवाजी पेठ     ४६.६५                                मंगळवार पेठ   ३८.११                               नागाळा पार्क      ४०.२९                               ताराबाई पार्क     ४६.८७

  • वाणिज्य           मिरजकर तिकटी  ५१.७६

                       बिनखांबी गणेश मंदिर ४४.९३                                  महाद्वार रोड    ५४.०५                                              गुजरी   ४३.७९                                पापाची तिकटी   ५९.६४                                     राजारामपुरी   ५१.०२                                          लक्ष्मीपुरी  ४२.९३                                              शाहूपुरी  ४२.०५                                              गंगावेश ६०.६९                                           बिंदू चौक  ५२.४०

  • औद्योगिक         शिवाजी उद्यमनगर ४५.१२

                                 वाय. पी. पोवार नगर ४३.४५सीपीसीबीची मार्गदर्शक पातळी (डेसिबलमध्ये, रात्रीच्या वेळी)क्षेत्र            पातळीऔद्योगिक   ७०वाणिज्य       ५५निवासी         ४५शांतता          ४० 

टॅग्स :environmentपर्यावरणGanesh Visarjanगणेश विसर्जनkolhapurकोल्हापूर