शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News: अंबाबाई मंदिर परिसरातील स्वच्छतागृहास जागा मिळेना, दीड कोटीचा निधी मिळूनही हतबलता

By भीमगोंड देसाई | Updated: January 11, 2023 13:48 IST

निधी देण्याची घोषणा करून जागा मिळवून दिली नाही तर स्वच्छतागृह कागदावरच राहणार

भीमगोंडा देसाई कोल्हापूर : येथील करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसरात सध्या एकही सार्वजनिक स्त्री, पुरुष स्वच्छतागृह नसल्याने पर्यटक, भाविकांची प्रचंड गैरसोय होत आहे. यामुळे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी स्वच्छतागृहासाठी दीड कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली आहे, पण स्वच्छतागृह बांधणार कोठे हे अनिश्चित आहे. परिणामी अंबाबाई मंदिर परिसरातील स्वच्छतागृहास कोणी जागा देता जागा अशी याचना करण्याची वेळ महापालिका प्रशासनावर आली आहे. या विषयात महापालिका हतबल झाली आहे.मंदिर परिसरातील जुन्या प्रांत कार्यालयाजवळ सार्वजनिक स्वच्छतागृह होते. ते मोडकळीस आल्याने पाडून त्याच ठिकाणी नवीन बांधण्याचे काम महापालिकेतर्फे केले जात होते, पण याला विरोध झाल्याने ते काम अर्धवट अवस्थेत पडून आहे. यामुळे सध्या परिसरात स्वच्छतागृह नाही.

यामुळे लांबचा प्रवास करून आलेल्या महिला पर्यटकांची मोठी कुचंबणा होत आहे. त्यांना नाईलाजास्तव जवळच्या घरमालकांना थोडं बाथरूमला जाऊन येतो, अशी विनवणी करावी लागत आहे. इतकी लाजिरवाणी वेळ महिला भाविकांवर आली तरीही स्वच्छतागृहांना जागा मिळवण्यासाठी ठोस पावले राज्यकर्त्यांकडून उचलले जात नसल्याचे पुढे येत आहे.स्वच्छतागृहासाठी पालकमंत्री केसरकर यांनी निधी देण्याची घोषणा करून जागा मिळवून दिली नाही तर स्वच्छतागृह कागदावरच राहणार आहे.पागा इमारतीमध्ये नियोजननवीन स्वच्छतागृह पागा इमारतीमध्ये बांधण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. पण ही इमारत हेरिटेज आहे. यामुळे स्वच्छतागृह बांधण्यासाठी पुरातत्व विभागाची परवानगी लागणार आहे. ही प्रकिया दिरंगाईची आणि वेळखाऊ आहे. यामुळे पागा इमारतीमध्येही तातडीने स्वच्छतागृहासाठी जागा मिळणार नाही.

बिंदू चौकातील पार्किंगमध्ये शक्यबिंदू चौकातील महापालिकेच्या पार्किंगमध्ये स्वच्छतागृह बांधण्यासाठी जागा आहे. या ठिकाणी पार्किंग स्थळ विकसित करण्याच्या आराखड्यात याचा समावेश आहे. यामुळे जिल्हा नियोजन समितीने दिलेल्या निधीतून या ठिकाणी वेगळे स्वच्छतागृह कसे आणि कोठे बांधायचे? असा प्रश्न उभा राहिला आहे.

अंबाबाई मंदिर परिसरात स्वच्छतागृह बांधण्यासाठी जागेचा शोध सुरू आहे. पागा इमारतीमध्ये जागा आहे का याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग घेत आहे.  - नेत्रदीप सरनोबत, शहर अभियंता, महापालिका

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर