शहरं
Join us  
Trending Stories
1
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
2
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
3
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
4
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
5
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
6
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
7
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
8
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
9
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
10
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
11
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
12
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
13
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
14
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
15
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
16
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
17
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार

नोकऱ्यांसाठी वशिल्याची नाही गरज-: पूर्ण परीक्षा अंॉनलाईन, प्रक्रिया पारदर्शक, मुलाखतीला फाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 1:05 AM

राज्यातील ३५ जिल्हा परिषदांच्या सुमारे १५ हजार जागा भरण्याच्या जाहिराती निघाल्यानंतर आता पैसे उकळण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. मात्र ही नोकरभरतीची प्रक्रिया आॅनलाईन आणि पारदर्शी असून, ती

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्हा परिषद

समीर देशपांडे ।कोल्हापूर : राज्यातील ३५ जिल्हा परिषदांच्या सुमारे १५ हजार जागा भरण्याच्या जाहिराती निघाल्यानंतर आता पैसे उकळण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. मात्र ही नोकरभरतीची प्रक्रिया आॅनलाईन आणि पारदर्शी असून, ती समजून घेऊन कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याची गरज आहे.

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने ३ मार्च रोजी एकाच दिवशी सर्व जिल्हा परिषदांना रिक्त जागांची जाहिरात देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जाहिराती प्रसिद्धही झाल्या. मात्र त्यानंतर काही जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आणि काही जिल्ह्यामध्ये ‘दलाल’ सक्रिय झाले असून, त्यांनी पैसे गोळा करायला सुरुवात केली आहे. वास्तविक जाहिराती याआधी आल्या असल्या तरी २६ मार्चच्या रात्री १० नंतर आॅनलाईन अर्ज दाखल करण्यासाठीचे पोर्टल खुले होणार आहे. १६ एप्रिल २०१९ च्या रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत आॅनलाईन अर्ज दाखल करता येणार आहेत.समान गुण मिळाले तर...वय आणि पदवी समान असेल तर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलाला प्राधान्य दिले जाईल.वय समान असेल तर उच्चतम शैक्षणिक पात्रता असणाºयाला प्राधान्य.वय, पदवी समान असेल तर किमान शैक्षणिक पात्रतेमध्ये सर्वाधिक गुण असणाºयास प्राधान्य.कुणाला कितीही जागांसाठी कुठल्याही जिल्हा परिषदेला अर्ज करता येतो.त्या त्या जिल्ह्यातील इंटरनेटची सुविधा असणाºया संगणकांची उपलब्ध संख्या पाहून एकूण चार ते पाच महिन्यांत ही नोकरभरतीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

अधिक माहितीसाठी    www.mahapariksha.gov.in या वेबसाईटवर माहिती घ्यावी लागणार आहे.ही परीक्षा २०० गुणांसाठी होईल.हे प्रश्न बहुपर्यायी राहणार आहेत.प्रश्न सोडविण्यासाठी दीड तास वेळ असेल.तांत्रिक पदांसाठी ४० गुणांचे प्रश्न त्या विषयावरील असतील.सर्वसाधारणपणे इंग्रजी, मराठी, सामान्यज्ञान आणि बुद्धिमापन या विषयासाठी प्रत्येकी १५ प्रश्न असतील.एका प्रश्नाला दोन गुण असतील.गुणांना उत्तीर्णज्या उमेदवाराला २०० पैकी ९० गुण म्हणजे ४५ टक्के गुण मिळतील तो उत्तीर्ण समजला जाईल. यानंतर सर्वसाधारण गुणवत्ता आणि प्रतीक्षा यादी तयार केली जाईल. ही यादी जिल्हा परिषदांकडे पाठविण्यात येईल. त्यानुसार उमेदवारांना बोलावून त्यांच्या कागदपत्रांची छाननी केली जाईल. त्यानंतर संबंधितांना नेमणूक पत्र दिले जाईल. ही निवड यादी एक वर्षासाठी ग्राह्य धरली जाईल.वयाची मर्यादा38खुल्या प्रवर्गासाठी43मागासवर्गीयांसाठी45अपंग, प्रकल्पग्रस्त, स्वातंत्र्यसैनिकांच्या पाल्यांसाठी43खेळाडूंसाठी38अनाथांसाठी43आर्थिकदृष्ट्या मागास (१० टक्के आरक्षणासाठी) 

ही संपूर्ण प्रक्रिया आॅनलाईन पद्धतीने होणार असल्याने कुणीही, कितीही सांगितले तरीही यामध्ये वशिला चालणार नाही. एकाच वर्गात पेपर सोडविताना प्रत्येकाला वेगळा पेपर जाणार आहे. त्यामुळे कुणालाही पैसे देऊन उमेदवारांनी फसवणूक करून घेऊ नये.- रविकांत आडसूळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद, कोल्हापूर

 

टॅग्स :Politicsराजकारणkolhapurकोल्हापूर