शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

"शक्तीपीठासाठी भूसंपादन नाही, विषय संपला", चंद्रकांत पाटील यांचे स्पष्टीकरण

By समीर देशपांडे | Updated: June 20, 2024 14:56 IST

Chandrakant Patil : हातकणगंले लोकसभा मतदारसंघाच्या आढाव्यासाठी पाटील कोल्हापुरात आले आहेत.

कोल्हापूर  : शक्तीपीठासाठी राज्यात भूसंपादन होणार नाही. हा विषय संपला असून मुलींच्या व्यावसायिक शिक्षणाच्या फीमाफीबद्दलचा शासन आदेश पदवीधर निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर निघेल असे स्पष्टीकरण उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे दिले. ते पत्रकारांशी बोलत होते.      हातकणगंले लोकसभा मतदारसंघाच्या आढाव्यासाठी पाटील कोल्हापुरात आले आहेत. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांना सविस्तर उत्तरे दिली. ते म्हणाले, उध्दव ठाकरे यांना पुन्हा एनडीएत यावेसे वाटत नसेल. पण राजकारणात आपण आज बोलू तसेच उद्या करू याची खात्री नसते. मराठा आरक्षण हे देवेंद्र फडणवीस यांनी दिले. परंतू ते न्यायालयात टिकले नाही. त्यानंतर आधीच्या त्रुटी सुधारून दहा टक्के आरक्षण दिले गेलो. पण शरद पवार हे ५० वर्षे राज्यातील राजकारणाचा केंद्रबिंदू होते. तेव्हा मराठा आरक्षण का दिले नाही हा खरा प्रश्न आहे. 

या प्रश्नात राजकारण्यांनी आगीत तेल ओतू नये. त्यात तुम्हीही भस्म व्हाल. समाज एक ठेवण्यासाठी प्रयत्न व्हावेत. मराठा आणि ओबीसी नेत्यांची बैठक घ्यावी लागेल. रक्तसंबंध आणि सगेसोयरे यात काहीही फरक नाही हे जरांगे पाटील यांना पटवून दिले पाहिजे. समाजाचं भलं कशात आहे हे त्यांनी पाहिलं पाहिजे.    नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या मालाला भाव वाढवून दिला आहे. नीट परीक्षेबाबत केंद्रीय मंत्र्यांनी लक्ष घालावं. पण चुकीचं काहीही सहन केलं जाणार नाही. कोल्हापूरच्या पदवीधर निवडणुकीत २०२० साली साडे सात हजार मतदार पदवीधर नसलेले सापडले. त्याची केस न्यायालयात सुरू आहे. निर्णय आमच्यासारखा होवू शकतो. कोल्हापूरसह राज्यात महायुतीतील घटक पक्षाने काम केलं नाही असा ठपका कोणीही ठेवला नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राष्ट्रवादीवर ठपका ठेवला नाही. करोडो स्वयंसेवकामधील एकाचे मत हे संघाचे मत होवू शकत नाही.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलkolhapurकोल्हापूर