शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

यंदाही गणेशोत्सवाच्या मिरवणुका नाहीच : मंडळांची मूर्ती ४ फुटांपर्यंतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 20:44 IST

CoronaVirus Ganesh Mahotsav Kolhapur : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने गुरुवारी गणेशोत्सवासंबंधी नियम जाहीर केले असून घरगुती गणेशमूर्तींना दोन फुटांची व सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तींना दोन फुट उंचीची मर्यादा घालून दिली आहे. आगमन व विसर्जन मिरवणुका काढू नयेत व कोरोना नियमांचे पालन करत व साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले आहे.

ठळक मुद्देयंदाही गणेशोत्सवाच्या मिरवणुका नाहीच : मंडळांची मूर्ती ४ फुटांपर्यंतचजिल्हा प्रशासनाकडून नियमावली जाहीर

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने गुरुवारी गणेशोत्सवासंबंधी नियम जाहीर केले असून घरगुती गणेशमूर्तींना दोन फुटांची व सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तींना दोन फुट उंचीची मर्यादा घालून दिली आहे. आगमन व विसर्जन मिरवणुका काढू नयेत व कोरोना नियमांचे पालन करत व साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले आहे.राज्य शासनाने दोन दिवसांपूर्वी गणेशोत्सवासंबंधी नियमावली जाहीर केल्यानंतर गुरुवारी जिल्ह्यासाठीच्या नियमांचा आदेश काढण्यात आला. त्यानुसार मंडळांनी नागरिकांना वर्गणी मागू नये, कोणी स्वेच्छेने दिली तर घ्यावी, सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडळांनी महापालिका व स्थानिक प्रशासनाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. तसेच मांडव मर्यादित स्वरूपात उभारून सजावट करताना त्यात भपकेबाजी नसावी. मंडळांची गणेशमूर्ती ४ फुटांपर्यंतच असावी.

मूर्ती शाडूची असल्यास त्याचे घरीच करावे. ते शक्य नसल्यास कृत्रिम कुंडात विसर्जन करण्यात यावे. आरोग्यविषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यात याव्यात. सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य उपक्रम, शिबिरे घेवून त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू अशा आजारांबाबत जागृती करण्यात यावी. ब्रेक द चेन अंतर्गत सुरू असलेल्या नियमात गणेशोत्सवानिमित्त शिथिलता दिली जाणार नाही. आरती, भजन, कीर्तन व धार्मिक कार्यक्रम घेताना गर्दी तसेच ध्वनीप्रदूषण होणार नाही, याची काळजी घ्यावी असे आदेशात म्हटले आहे.भक्तांच्या सोयीसाठी श्री गणेशाच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुकद्वारे करावी, मंडपांमध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था करा. भाविकांसाठी शारीरिक अंतर, मास्क,सॅनिटायझर हे नियमांचे पालन करण्यात यावे. श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी, अशा सूचनाही आदेशात देण्यात आल्या आहेत.उंचीवर बंधने नकोत..काही कुंभारांनी ४ फुटांवरील गणेशमूर्ती तयार केल्या आहेत, त्यामुळे मूर्तीच्या उंचीवर बंधने घालू नयेत, अशी मागणी कुंभार समाजाने केली होती. मात्र गेल्यावर्षी शासनाने हा नियम घालून दिला असून त्यात यंदादेखील बदल केलेला नाही. त्यामुळे ज्यांनी जास्त उंचीच्या मूर्ती बनवल्या आहेत, त्यांना नुकसान सोसावे लागणार आहे.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवkolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारीcorona virusकोरोना वायरस बातम्या