शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
2
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
3
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट
4
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
5
Mumbai Crime: "शेवटचे दिवस जवळ आलेत", भावेश शिंदे घरातून बाहेर पडला आणि मुंबई लोकलखाली संपवले आयुष्य
6
निष्काळजीपणाचा कळस! रुग्णालयात महिलेला लावलं एक्सपायर्ड ग्लुकोज, तोंडातून फेस आला अन्...
7
बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीतच भाजपची मोठी कारवाई, चार नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; करण्यात आले गंभीर आरोप
8
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
9
“महायुतीचे शेतकरी पॅकेज थोतांड, कर्जमाफी करावी; राज्य दिवाळखोरीत काढले”: हर्षवर्धन सपकाळ
10
EPF खातेधारकांना मोठी भेट! 'फ्री'मध्ये मिळतोय ₹७ लाखांपर्यंतचा जीवन विमा; कुटुंबाला मिळेल मोठा आधार
11
२० वर्षीय भारतीय तरुणीवर ब्रिटनमध्ये बलात्कार, आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद; वर्णद्वेषातून कृत्य
12
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा
13
मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
14
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
15
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
16
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
17
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ!
18
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
19
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत

Kolhapur: ‘यंदा चुकीला माफी नाही’; मंत्री मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांचे स्टेटस, मंडलिक यांना सूचक इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 16:52 IST

विधानसभेतील चुकीला उत्तर देण्याची तयारी..

कोल्हापूर : वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांच्या स्टेटसची सध्या कागलसह जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे. ‘यंदा चुकीला माफी नाही’, या स्टेटसचे अर्थ वेगवेगळे काढले जात असले, तरी विधानसभा निवडणुकीत महायुतीतील राजकारणाचा राग यातून व्यक्त केला जात आहे. त्यातूनच माजी खासदार संजय मंडलिक यांच्या गटाला हा सूचक इशारा असल्याचे म्हटले जात आहे.कागलमधील सत्तासंघर्ष जिल्ह्याला नवा नाही. स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक व विक्रमसिंह घाटगे यांच्यातील संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला. त्यानंतर मंडलिक व मंत्री हसन मुश्रीफ यांच्यातील टाेकाचा संघर्ष येथील जनतेने अनुभवला. अलीकडे मुश्रीफ व समरजीत घाटगे यांच्यातील राजकीय संघर्ष व्यक्तिगत पातळीवर पाेहोचला. या सगळ्या पार्श्वभूमीवर लोकसभेची निवडणूक झाली. यामध्ये कागलमधील संजय घाटगे वगळता सगळे नेते एकत्र असताना संजय मंडलिक यांना अपेक्षित मताधिक्य मिळाले नसल्याची सल मंडलिक यांच्या कार्यकर्त्यांत होती. त्याचे थेट पडसाद विधानसभा निवडणुकीत दिसले. निवडणुकीच्या आधीच विरेंद्र मंडलिक यांनी मंत्री मुश्रीफ यांच्यावर हल्ला चढवला होता. नंतरच्या काळात मंडलिक गट शांत होऊन मुश्रीफ यांच्या प्रचारात सक्रिय दिसला, पण अपेक्षित मदत झाली नसल्याची तक्रार मुश्रीफ गटाची आहे. तेव्हापासून एकमेकांचे उट्टे कोठे काढता येईल, याची संधी दोन्ही गट शोधत आहेत. स्टेटसच्या माध्यमातून आव्हान-प्रतिआव्हान देण्याचे प्रकार वाढले असून, गेले दोन दिवस ‘यंदा चुकीला माफी नाही’, हा स्टेटस मंत्री मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांचा दिसत आहे.

घाटगे यांना सोबत..मंडलिक व मुश्रीफ यांच्यातील वाद कमी करण्याची भूमिका २०१५ ला मंत्री मुश्रीफ यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीपासून घेतली. संजय मंडलिक यांना सोबत घेऊन त्यांनी माजी आमदार संजय घाटगे यांना झटका दिला होता. आता घाटगे यांना सोबत घेत मंडलिक यांना शह देण्याचा प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे.‘हमीदवाडा’ कारखान्यात कोंडी शक्यहमीदवाडा साखर कारखान्याच्या २००७ व २०१२ च्या निवडणुकीत मंडलिक व मुश्रीफ गटातील संघर्ष उफाळला होता. त्यानंतर २०१७ व कोरोनामुळे लांबलेली जून २०२३ची निवडणूक बिनविरोध झाली. मात्र, मुश्रीफ गटांतर्गत हालचाली पाहता, ‘हमीदवाडा’ कारखान्याच्या निवडणुकीत मंडलिक गटाची कोंडी करण्याची संधी ते सोडतील, असे वाटत नाही.

समरजीत यांचे ‘वेट ॲण्ड वॉच’विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपामधून राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आलेले समरजीत घाटगे हे पुन्हा स्वगृही परतणार, अशी चर्चा होती. पण, ते गेले दोन दिवस ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत कोल्हापुरात राहिल्याने सध्या तरी त्यांची ‘वेट ॲण्ड वॉच’ची भूमिका राहणार, हे निश्चित आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkagal-acकागलHasan Mushrifहसन मुश्रीफsanjay mandlikसंजय मंडलिक