शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: खंडपीठाबाबत कोणताही निर्णय नाही, खंडपीठ कृती समितीचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 16:06 IST

काही प्रसार माध्यमांनी बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत. याबाबत खंडपीठ कृती समितीने प्रसिद्धीपत्रक काढले

कोल्हापूर : 'मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात सुरू करण्याबाबत उच्च न्यायालयाकडून कोणतीही माहिती कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन किंवा खंडपीठ कृती समितीला मिळालेली नाही. अधिकृत निर्णय होताच याची माहिती जाहीर केली जाईल,' असे खंडपीठ कृती समितीने बुधवारी (दि. १६) प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले.मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ लवकरच कोल्हापुरात सुरू होणार असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर काही प्रसार माध्यमांनी बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत. याबाबत खंडपीठ कृती समितीने बुधवारी प्रसिद्धीपत्रक काढले. 'कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरू होणार, अशा आशयाच्या बातम्या काही दैनिके आणि वृत्तवाहिन्यांमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत. तथापि, याबाबत कोणतीही माहिती मुंबई उच्च न्यायालय आणि महाराष्ट्र शासनाकडून खंडपीठ कृती समितीला प्राप्त झालेली नाही,' असे त्यांनी पत्रकातून स्पष्ट केले आहे. कृती समितीचे निमंत्रक तथा जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष व्ही. आर. पाटील यांनी प्रसिद्धीपत्रक दिले.