शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

मनपा निवडणुकीपूर्वी गुन्हेगारांना तडिपार करणार

By admin | Updated: May 21, 2015 00:44 IST

एस. चैतन्या यांची माहिती : नूतन अप्पर पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारला

कोल्हापूर : आगामी महापालिका निवडणुकीमध्ये काही गुन्हेगार निवडणूक लढविण्यामध्ये सक्रिय असल्याचे समजते. त्यासाठी ते आतापासून आपल्या नावाचा गाजावाजा करीत आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यासाठी प्रस्ताव पोलीस ठाणे स्तरावर सुरू असून, निवडणूक कालावधीमध्ये एकही गुन्हेगार शहरात व उपनगरांत दिसणार नाही, त्यासाठी त्यांना सळो की पळो करून सोडू, अशी माहिती नूतन अप्पर पोलीस अधीक्षक एस. चैतन्या यांनी पत्रकारांना दिली. बुधवारी एस. चैतन्या यांनी मावळते अप्पर पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्याकडून बुधवारी पदभार स्वीकारला. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा उपस्थित होते. कोल्हापूरचे अप्पर पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांची वर्धा जिल्ह्णाच्या पोलीस अधीक्षकपदी पदोन्नती झाली. त्यांच्या जागी इचलकरंजी विभागाचे पोलीस उपअधीक्षक एस. चैतन्या यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानुसार त्यांनी बुधवारी सकाळी ११ वाजता मावळते अप्पर पोलीस अधीक्षक गोयल यांच्याकडून पदभार स्वीकारला. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, इचलकरंजी विभागात गेल्या दोन वर्षांपासून काम करीत असल्याने कोल्हापूर शहराची चांगली ओळख आहे. आगामी महापालिका निवडणूक लढविण्यासाठी काही ‘आर.सी.’ व ‘एस.टी.’ गँगचे गुन्हेगार सक्रिय आहेत. त्यासाठी त्यांना काही राजकीय व गुन्हेगारी टोळ्यांकडून पाठबळ मिळत असल्याचे समजते. या गुन्हेगारांमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडून जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर निवडणुकीपूर्वी सर्व सराईत गुन्हेगारांना तडीपार केले जाईल, असे चैतन्या यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)पानसरे हत्येचा छडा लावणारचज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासामध्ये मी सुरुवातीपासून आहे. आता या तपासाची सर्वस्वी जबाबदारी माझ्यावर पडल्याने तो माझ्यासाठी महत्त्वाचा बनला आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये तपासासाठी भरपूर प्रयत्न झाले असले तरी आव्हानात्मक दृष्टिकोनातून या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे.पोलीस ठाण्याच्या प्रमुखाला नोटीसजिल्ह्यात सुरुवातीपासून अवैध व्यावसायिकांवर कठोर कारवाई केली जात आहे. शहरात कुठे मटका, जुगार, दारूसाठा, आदी अवैध प्रकार दिसून आल्यास संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रमुखाला नोटीस काढली जाईल. जिल्ह्णातील सर्व अवैध धंदे मोडीत काढण्यासाठी कठोर पावले उचलणार आहे.