शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

रस्त्यावरील शोधमोहिमेत नऊ कोरोना बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 19:26 IST

CoronaVirus Kolhapur : खुलेआम रस्त्यावर फिरुन कोरोनाचा संसर्ग वाढवत आहेत. अशा व्यक्तींचा शोध घेण्यासाठी महापालिका प्रशासनाने शुक्रवारी मोहीम राबिवली. त्यामध्ये शहरात नऊ व्यक्ती बाधित आढळून आल्या. त्यांना तत्काळ विलगीकरण कक्षात धाडण्यात आले.

ठळक मुद्देरस्त्यावरील शोधमोहिमेत नऊ कोरोना बाधितशंका आली म्हणून चाचणी, घरातील चौघे बाधित

कोल्हापूर : खुलेआम रस्त्यावर फिरुन कोरोनाचा संसर्ग वाढवत आहेत. अशा व्यक्तींचा शोध घेण्यासाठी महापालिका प्रशासनाने शुक्रवारी मोहीम राबिवली. त्यामध्ये शहरात नऊ व्यक्ती बाधित आढळून आल्या. त्यांना तत्काळ विलगीकरण कक्षात धाडण्यात आले.महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने कोरोनाचे सुपरस्प्रेडर असलेल्या भाजी, फळ विक्रेत्यांची कोरोनाची ॲन्टिजन चाचणी सुरू केली. त्यानंतर रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची चाचणी केली. त्यातूनही काही व्यक्ती कोरोना बाधित असल्याची बाब उघड झाली. त्यामुळे कोरोना किती विचित्र आजार आहे, हे दिसून येत आहे.शुक्रवारपासून आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आपला मोर्चा खासगी लक्झरी बस आणि रिक्षाचालकांकडे वळविला. मध्यवर्ती बस स्थानक परिसरात दोन पथके तैनात करून सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेत रिक्षाचालक, बसमधून येणारे प्रवासी अशा १३३ व्यक्तींची ॲन्टिजन चाचणी करण्यात आली. त्यामध्ये आठ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याची बाब समोर आली.

या सर्वांना तत्काळ कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. या मोहिमेत चार लक्झरी बसेस, १६ चारचाकी वाहनातील प्रवाशांचा तसेच लक्झरी बस बुकींग करणाऱ्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांचाही कोरोना चाचणी केलेल्यांमध्ये समावेश आहे.कनान नगरात १०८ जणांची तपासणीमहापालिकेच्या आरोग्य विभागाने कनान नगर येथे रस्त्यावर फिरणाऱ्या १०८ व्यक्तींची ॲन्टिजन तपासणी केली, तेव्हा एक रुग्ण कोरोना बाधित आढळून आला. गेल्या वर्षी कनान नगर झोपडपट्टीत काही रुग्ण आढळल्याने तेथे मोठी घबराट निर्माण झाली होती, तसेच दाट वस्ती असल्याने प्रसार थांबविण्याचे एक आव्हान प्रशासनासमोर होते.शंका आली म्हणून चाचणी, घरातील चौघे बाधितकळंबा येथे वास्तव्यास असलेल्या एका ग्रामविकास अधिकाऱ्याला मनात केवळ शंका आली म्हणून त्याने मध्यवर्ती बस स्थानक परिसरात ॲन्टिजन चाचणी करून घेतली. ते स्वत: बाधित होतेच, शिवाय त्यांची पत्नी, दोन मुलेही बाधित असल्याची बाब समोर आली. हिरवडे दुमाला येथील रहिवासी असल्याने त्या गावाच्या सरपंचांना त्याची माहिती देण्यात आली. कारण याच व्यक्तीचे दोन चुलतेही कोरोना बाधित झाले होते. महावितरणमधील एका विद्युत निरीक्षकाची या ठिकाणी स्वॅब घेऊन चाचणी करण्यात आली, तेव्हा तोही कोरोनाबाधित आढळून आला. त्याची रवानगी डीओटीकडे करण्यात आली, तर त्याची माहिती हातकणंगले प्राथमिक आरोग्य केंद्राला देण्यात आली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर