शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

आशियाई युथ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत कोल्हापूरचा डंका, निकिता कमलाकरला रौप्यपदक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 12:53 IST

अपंगावर मात करत शहरात चहा विकून संसाराचा गाडा चालविणाऱ्या सुनिल रावसाहेब कमलाकर यांच्या लेकीचे दैदीप्यमान यश

गणपती कोळीकुरुंदवाड : अपंगावर मात करत शहरात चहा विकून संसाराचा गाडा चालविणाऱ्या तेरवाड (ता. शिरोळ) येथील सुनिल रावसाहेब कमलाकर यांची मुलगी निकिता सुनिल कमलाकर हीने आशियाई युथ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत रौप्य पदक पटकावले. उझबेकिस्तान येथील ताश्कंद शहरात या स्पर्धा सुरू आहेत. तीच्या या यशामुळे शहराचे नाव पुन्हा एकदा सातासमुद्रापार झाले आहे. निकिताला पदक मिळाल्याचे  समजताच आई वडीलांसह आजोबांच्या डोळ्यातून आनंदाश्रू मावत नव्हते.उझबेकिस्तान येथील ताश्कंद येथे आशियाई युथ वेटलिफ्टिंग स्पर्धा सुरू आहेत. यामध्ये 55 किलो वजनी गटात निकिताने 68 किलो स्नँक आणि 95 किलो क्लीन अँन्ड जर्क असे एकूण 163 किलो वजन उचलून रौप्य पदक प्राप्त केले. तर क्लीन अँन्ड जर्क मध्ये सुवर्णपदक पटकावले.निकिताने एक महिन्यापूर्वी मेक्सिको येथे झालेल्या वर्ल्ड  च़म्पियनशिप स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते मात्र तिचे पदक हुकले होते. तीला विश्वविजय जीमचे प्रशिक्षक विजय माळी, प्रशिक्षक विश्वनाथ माळी, निशांत पोवार यांचे मार्गदर्शन लाभले.घरची परिस्थिती प्रतिकुलसुनिल कमलाकर हे एका पायाने अपंग आहेत. घरची शेती नाही त्यामुळे घरचा चरितार्थ चालविण्यासाठी सुनिल आणि त्यांचे वडील रावसाहेब शहरातील दर्गा चौकात चहाचा गाडा चालवतात. या गाड्यावर वडील थांबतात तर सुनिल शहरात फिरुन चहा विकतो. तर मुलांच्या शिक्षणाचा खर्च यावर भागत नसल्याने निकिताची आई दत्त साखर कारखाण्यातील दवाखान्यात सेविका (नर्स) म्हणून काम करते.निकिता दत्त महाविद्यालयात बारावी वर्गात शिकत आहे. तिला वेटलिप्टिंगची आवड असल्याने शहरातील वेटलिफ्टिंग प्रशिक्षक विजय माळी यांच्या विश्वविजय जीममध्ये वेटलिफ्टिंगचे प्रशिक्षण घेत आहे.

निकिता आशियाई स्पर्धेत पदक  मिळविल्याने आमच्या कष्टाचे चीज झाले. तीच्या कोणत्याही आंतराष्ट्रीय स्पर्धेसाठी तीला कशाचीही कमतरता पडू देणार नाही. त्यासाठी आम्हाला कितीही कष्ट सोसावे लागले तरी ती सोसण्याची आमची तयारी आहे. - सुनिल कमलाकर, तेरवाड - निकिताचे वडील

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWeightliftingवेटलिफ्टिंग